Tuesday, September 29, 2026

Mumbai Rat Found In Dosa: किळसवाणा प्रकार! मुंबईच्या हॉटेलमध्ये मसाला डोशात मेलेला उंदीर, दोन घास घेताच...

Mumbai Rat Found In Dosa: किळसवाणा प्रकार! मुंबईच्या हॉटेलमध्ये मसाला डोशात मेलेला उंदीर, दोन घास घेताच...

मुंबई: हॉटेल- रेस्टॉरंटमध्ये बऱ्याचदा अस्वच्छता, किळसवाण्या पद्धतीने जेवण बनवणं आणि अनेक स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे सध्या एफडीएकडून महाराष्ट्रामध्ये कारवाई करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर दररोज एफडीएकडून हॉटेल- रेस्टॉरंट, बेकरी आणि दुकानांवर धडक कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. इतकं होत असतानाही मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये म्हैसूर मसाला डोसामध्ये मेलेला उंदीर आढळला आहे. मेलेला उंदीर दिसताच ग्राहकाने हॉटेल मालकाविरोधात संताप व्यक्त करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुंबईतील बोरिवली पश्चिममधील एका रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाने म्हैसूर मसाला डोसाची ऑर्डर दिली होती. त्या मसाला डोसामध्ये मेलेला उंदीर आढळून आल्याची घटना घडली. घटनेनंतर ग्राहकाने तात्काळ बोरिवली पोलिसांमध्ये धाव घेत हॉटेल चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. ग्राहकाने एक- दोन घास खाल्ल्यानंतर डोसामध्ये मेलेला उंदिर दिसताच ग्राहकाच्या रागाचा पारा वाढला. त्याने व्हिडिओच्या माध्यमातून हॉटेल चालकावर कारवाईची मागणी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डोसामध्ये उंदीर आढळलेल्या ग्राहकाचं नाल अमित त्रिवेदी असं आहे. तो आपल्या दोन भावांसोबत आणि मुलासोबत बोरिवलीतील एका साऊथ इंडियन हॉटेलमध्ये गेला होता. तिथे हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

डोसामध्ये मेलेला उंदीर पाहून अमित यांना उलट्या सुरू झाल्या. ग्राहकाने हॉटेलविरोधात बोरिवली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. शिवाय, ग्राहकाने अन्न-औषध प्रशासनाकडे अन्न सुरक्षेच्या चौकशीची मागणी केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा हॉटेलमधील स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बोरिवली पोलीस, एफडीए आणि बीएमसीकडून या हॉटेल चालकावर काय कारवाई केली जातेय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >