Nashik : आठवडे बाजारातील भेळ-चटणीमुळे विषबाधा, रुग्णसंख्या 186 वर पोहोचली ; मालेगावात खळबळ

Nashik : मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे आठवडी बाजारात भेळभत्त्यासोबत खाल्लेल्या दूषित चटणीमुळे १८६ जणांना विषबाधा झाल्याचे प्राथमिक आरोग्य अहवालातून समोर आले आहे. ज्या नागरिकांनी चटणीसह भेळभत्ता खाल्ला, त्यांनाच उलटी, जुलाब आणि मळमळीसारखा त्रास झाल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. रविवारी (२७ सप्टेंबर) नांदगाव बुद्रुक येथे आठवडी बाजार भरला होता. यावेळी पाटणे येथील एका विक्रेत्याने भेळभत्ता आणि तीन प्रकारच्या चटण्या विक्रीसाठी आणल्या होत्या. हे पदार्थ खाल्ल्यानंतर सोमवारी सकाळपासून ग्रामस्थांना अचानक उलटी, जुलाब आणि मळमळीसारखा त्रास सुरू झाला.



चटणीमुळेच विषबाधा झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष


तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी गावात प्रत्यक्ष सर्वेक्षण करून प्राथमिक अहवाल सादर केला आहे. चटणीसह भेळभत्ता खाल्लेल्या नागरिकांनाच विषबाधेची लक्षणे आढळली, तर चटणीशिवाय भेळ खाल्लेल्या नागरिकांना कोणताही त्रास झाला नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भेळभत्त्यासोबत देण्यात आलेली चटणी दूषित असल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.



१८६ रुग्णांवर उपचार सुरू


घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने तातडीने गावात धाव घेतली. सध्या मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात १०९, महिला व बाल रुग्णालयात ७१ आणि कॅम्प येथील नागरी आरोग्य केंद्रात ६, अशा एकूण १८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नांदगाव बुद्रुकसह भोरटे वस्ती, आनंदवाडी, गुंजाळवाडी, वाके आणि सौंदाणे परिसरातील नागरिकांचाही बाधितांमध्ये समावेश आहे.



दादा भुसे यांची रुग्णालयात भेट


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन बाधितांची भेट घेतली. त्यांनी रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपचार आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. सुरुवातीला काही रुग्णांवर स्थानिक पातळीवर उपचार करण्यात आले. मात्र, रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आणि बाधितांना मालेगाव येथील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले.



भेळ व चटणीचे नमुने प्रयोगशाळेत


या प्रकरणी तालुका पोलिसांनी पाटणे येथील भेळभत्ता विक्रेता हिला मोरे याला ताब्यात घेतले आहे. तसेच भेळभत्ता आणि चटणीचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



एका बालकाची प्रकृती चिंताजनक


विषबाधा झालेल्यांमध्ये गुरु सागर कुवर (वय ४) या बालकाची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, इतर सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रल्हाद गुठे आणि डॉ. ए. ए. मोमीन यांनी दिली. दरम्यान, गावात साथरोग सर्वेक्षणासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली असून, परिस्थितीवर आरोग्य विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

World Heart Day : सावधान! हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देते 'हे' गंभीर संकेत; वेळेवर ओळखा लक्षणे

World Heart Day : आज 29 सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक हृदय दिन (World Heart Day) साजरा केला जातो. हृदयाच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि

Shardiya Navratri 2026: नवरात्रीत एका दिवशी पडणार दोन माळ, अष्टमी आणि नवमी तिथीबाबत जाणून घ्या

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवचं विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसात देवीचा जागर केला जातो. देवीच्यी नऊ रुपांची

Drishyam 3 : दृश्यम 3 पाहा अन् फ्री पावभाजी खा! पण ‘ही’ अट लक्षात ठेवा

मुंबई : अभिनेता अजय देवगणच्या  (Ajay Devgan) बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3’ची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ‘Drishyam: The Conclusion’ हा

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 10 शतकं ठोकूनही शुभमन गिल अनलकी! असं का म्हणाला आर अश्विन?

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघाची बांधणी केली जात आहे. त्याचीच चाचपणी म्हणून आता प्रत्येक

Asian Games 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान लढत होणार? उपांत्य फेरीचं गणित समजून घ्या

जापानच्या आइची नगोया येथे एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू असून पुरूष क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे. या

S. Chockalingam : 'एसआयआर' प्रक्रियेत स्थानिक अधिकाऱ्यांचे अधिकार पूर्ववत करा

- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांचे केंद्रीय आयोगाला पत्र मुंबई : मतदार यादीच्या विशेष सखोल