महिला 4x400 मीटर रिले संघाने जिंकले सुवर्ण पदक
भारताच्या महिला 4x400 मीटर रिले संघाने चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले आहे. किरण, पूवम्मा माशेट्टीरा, प्राची आणि विथ्या रामराज या भारतीय महिलांच्या चौकडीने 3:29.69 मिनिटांची उत्कृष्ट वेळ नोंदवत हे सुवर्ण पदक पटकावले. चालू आशियाई खेळ स्पर्धेतील भारताचे हे एकूण सहावे सुवर्ण पदक ठरले आहे.
INDIAN 4X400 WOMEN’S TEAM WINS THE GOLD MEDAL AT ASIAN GAMES! 🥹🥇 pic.twitter.com/ueTzUevTIp
— The Khel India (@TheKhelIndia) September 29, 2026
नेमबाज नीरू धांडाने रचला इतिहास!
भारताची स्टार नेमबाज नीरू धांडा हिने शानदार कामगिरी करत महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप शूटिंग प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे. यासह या स्पर्धेत भारताच्या खात्यात जमा झालेले हे पाचवे सुवर्ण पदक ठरले आहे. विशेष म्हणजे, या वैयक्तिक ऐतिहासिक कामगिरीपूर्वी नीरूने याच स्पर्धेत भारताच्या महिला ट्रॅप संघासह रौप्य पदकदेखील पटकावले होते.
महिला ट्रॅप शूटिंग संघाने वेधले रौप्य पदक
एशियन गेम्स 2026 मध्ये नेमबाजी प्रकारात भारताला आणखी एक रौप्य पदक मिळाले आहे. यावेळी भारतासाठी हे रौप्य पदक महिला ट्रॅप संघाने जिंकले. भारताच्या नीरू, मनीषा आणि आशिमा या त्रिकुटाने 328 गुणांच्या स्कोअरसह रौप्य पदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत सुवर्ण पदक चीनच्या महिला संघाने पटकावले, त्यांनी 346 चा स्कोअर केला.
Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी दमदार कामगिरी करत ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले. नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा ...
गुलवीर सिंहचा ऐतिहासिक पराक्रम; रचला नवा इतिहास!
भारताचा स्टार डिस्टन्स रनर गुलवीर सिंहने पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत 13:32.75 मिनिटांची वेळ नोंदवत कांस्य पदक जिंकले. विशेष म्हणजे, एशियन गेम्समधील गुलवीरचे हे सलग तिसरे पदक ठरले आहे. या कामगिरीसह एकाच आशियाई स्पर्धेत ट्रॅक अँड फील्डमध्ये सलग तीन पदके जिंकणारा तो भारताचा केवळ दुसरा खेळाडू बनला आहे. यापूर्वी 1986 च्या सोल आशियाई खेळात महान धावपटू पी. टी. उषा यांनी 4 पदके जिंकण्याचा पराक्रम केला होता.
4x100 मिश्र रिले संघाने नोंदवला मोसमातील सर्वोत्तम खेळ
भारताने 4x100 मिश्र रिले शर्यतीतही कांस्य पदकावर नाव कोरले. भारताच्या गुरिंदरवीर सिंह, स्नेहा, अनिमेष कुजूर आणि हरिता भद्रा या चौघांनी मिळून जबरदस्त धाव घेतली. त्यांनी 41.06 सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली. ही या भारतीय संघाची या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
Congratulations to Gurindervir, Animesh, Sneha, and Harita on winning the Bronze Medal in the 4x100m Mixed Relay at #AsianGames2026. #Cheer4Bharat pic.twitter.com/vMGaV4HfjK
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) September 29, 2026
उंच उडीत पूजाची कांस्य पदकाची झेप
महिलांच्या उंच उडी स्पर्धेत भारताच्या पूजा हिने कांस्य पदक आपल्या नावावर केले. पूजाला 1.87 मीटरची उंची पार करता आली नाही, मात्र तिने 1.84 मीटरची सर्वोत्तम उडी मारत तिसरे स्थान पटकावले आणि देशासाठी कांस्य पदक निश्चित केले.
बॉक्सिंगमध्ये नरेंद्र बरवालला कांस्य पदक
पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात भारताला बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक मिळाले. भारताचा मुष्टीयोद्धा नरेंद्र बरवाल याला उपांत्य फेरीच्या सामन्यात सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले असले तरी त्याने भारताच्या खात्यात आणखी एका मानाच्या कांस्य पदकाची भर घातली.