Asian Games 2026 : नीरू धांडाने रचला इतिहास, भारतीय महिला नेमबाजांची दमदार कामगिरी; ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्यपदक

 Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी दमदार कामगिरी करत ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले. नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या भारतीय संघाने एकूण 328 गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले. चीनच्या संघाने 346 गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर कुवेतच्या संघाला कांस्यपदक मिळाले. ( Indian Women Shootersa)


या सामन्यात नीरू धांडाने 118 गुणांची नोंद करत विशेष कामगिरी केली. तिने महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप प्रकारातील अंतिम फेरीसाठीही पात्रता मिळवली आहे. नीरूने कतारच्या रे बासिलसोबत 118 गुणांची बरोबरी करत आशियाई क्रीडा स्पर्धेतील पात्रता विक्रमाची नोंद केली. वैयक्तिक प्रकारात आशिमा अहलावत 16व्या, तर मनीषा कीर 23व्या स्थानावर राहिली.


नीरू धांडा ही भारतातील आघाडीच्या ट्रॅप नेमबाजांपैकी एक आहे. 26 वर्षीय नीरूने याआधी ISSF शॉटगन विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. इटलीतील लोनाटो येथे झालेल्या या स्पर्धेत ती महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. ( Asian Games 2026)



विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नीरूने फ्रान्सच्या माजी विश्वविजेत्या आणि ऑलिम्पियन कॅरोल कॉर्मेनियर यांच्यावर मात केली होती. या कामगिरीनंतर आंतरराष्ट्रीय नेमबाजीमध्ये तिची ओळख आणखी मजबूत झाली.


नीरूचा खेळातील प्रवास मात्र सोपा नव्हता. सामान्य कुटुंबातून आलेल्या नीरूने आर्थिक अडचणींचा सामना करत नेमबाजीमध्ये आपले स्थान निर्माण केले. मेहनत, सातत्य आणि चांगल्या कामगिरीच्या जोरावर तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.


आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक रौप्यपदकानंतर नीरूची वैयक्तिक अंतिम फेरीतील कामगिरीही महत्त्वाची ठरणार आहे. तिच्या या कामगिरीमुळे भारतीय नेमबाजी संघाच्या पदकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.

Comments
Add Comment

Asian Games 2026 : भारत-श्रीलंका आमनेसामने; आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रंगणार मोठा सामना

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात उपांत्य फेरीचा सामना

Vithya Ramraj : विथ्या रामराजचा ऐतिहासिक पराक्रम! पी. टी. उषा यांचा 42 वर्षांचा विक्रम मोडीत काढत जिंकले कांस्यपदक

भारताची अडथळा शर्यतपटू विथ्या रामराज हिने 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मोठी कामगिरी केली आहे. आयची-नागोया येथे

सोमवार की रविवार? आठवड्याच्या कोणत्या दिवशी चालतो विराट कोहलीचा सर्वाधिक धुमाकूळ? वाचा आकडेवारी

विराट कोहली हे क्रिकेटविश्वातील खूप मोठं नाव आहे. भारतीय क्रिकेटविश्वात सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक नावलौकिक

विराट कोहलीचा 60 शतकांचा विक्रम मोडणं खूपच कठीण! असं का ते जाणून घ्या

वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला वनडे सामना भारताने 8 गडी राखून जिंकला. या विजयात कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली

Asian Games 2026 : नीरज चोप्राच्या अनुपस्थितीतही भारताची चमकदार कामगिरी; यशवीर सिंगला रौप्य तर रोहित यादवला कांस्यपदक

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भारताचा

SA vs AUS: कसोटी मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा जखमी खेळाडूवर डाव, 3 वर्षानंतर हा गोलंदाज परतणार

दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला वनडे मालिकेत मात खावी लागली आहे. तीन सामन्यांची वनडे