मुंबई : महाराष्ट्रातील काही भागांत कमी आणि असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आगामी रबी हंगामासाठी राज्याला विशेष मदत द्यावी, अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली. राष्ट्रीय कृषी संमेलन - रब्बी अभियान 2026 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि आवश्यक उपाययोजनांची माहिती मांडली.(Dattatray Bharne)
कमी पावसामुळे विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर जमिनीतील ओलावा आणि पाण्याची कमतरता हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी आणि जमिनीतील ओलाव्यानुसार पिकांची निवड करण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन करण्याची गरज भरणे यांनी व्यक्त केली. हरभरा, गहू, रबी ज्वारी, करडई आणि विविध तेलबियांच्या उत्पादनावर याचा परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. (Dattatray Bharne)
मुंबई : निवडणुकीच्या निकालानंतर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...
यांत्रिकीकरणासाठी ₹500 कोटींची मागणी
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी महाराष्ट्राला ₹500 कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या निधीतून अधिकाधिक शेतकऱ्यांना BBF यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.(Dattatray Bharne)
सूक्ष्म सिंचनासाठीही ₹500 कोटी
पाण्याची उपलब्धता आणि हवामानातील बदल लक्षात घेता सूक्ष्म सिंचनाचा विस्तार महत्त्वाचा असल्याचे सांगत, त्यासाठीही ₹500 कोटींचा निधी देण्याची मागणी करण्यात आली.
10 लाख रबी ज्वारी बीज मिनी किट्सची मागणी
पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता आगामी रबी हंगामासाठी 10 लाख रबी ज्वारी बीज मिनी किट्स मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे ज्वारी उत्पादनासोबतच पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल.(Dattatray Bharne)
मुंबई : महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत प्रारूप मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या सुमारे १.५२ कोटी मतदारांपैकी आतापर्यंत फक्त ...
पीक विम्यात प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करण्याची मागणी
यंदा काही पिके वरून हिरवी दिसत असली तरी पावसातील मोठ्या खंडामुळे त्यामध्ये अपेक्षित उत्पादन नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पीक विम्यासाठी केवळ उपग्रह प्रतिमांवर आधारित उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक परिस्थितीचाही विचार करावा, अशी मागणी दत्तात्रय भरणे यांनी केली.
दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केंद्र आणि राज्यांनी ‘टीम ॲग्रीकल्चर’च्या भावनेने काम करण्याचे आवाहन केले. राज्य आणि जिल्हास्तरावर नियमित बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या, पीक नियोजन, विमा, बियाणे आणि बाजारव्यवस्थेवर समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.(Dattatray Bharne)
मृदा आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी 22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत देशभर ‘खेत बचाओ अभियान’ राबविण्यात येणार आहे. तसेच तूर, उडद आणि मसूर यांची किमान आधारभूत किमतीवर 100% सरकारी खरेदी आणि 48 तासांत देयक देण्याच्या व्यवस्थेची माहितीही केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली.(Dattatray Bharne)






