Tuesday, September 29, 2026

Model Tanya Mishra : कोण आहे तान्या मिश्रा? सोशल मीडियावर व्हायरल फोटोमुळे ‘नॅशनल क्रश’ची चर्चा

Model Tanya Mishra : कोण आहे तान्या मिश्रा? सोशल मीडियावर व्हायरल फोटोमुळे ‘नॅशनल क्रश’ची चर्चा

सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री आणि मॉडेल तान्या मिश्रा (Tanya) हिची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तान्याचे ग्लॅमरस फोटो आणि स्टायलिश लूक पाहून अनेक नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे तिच्या डोळ्यांची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा होत असून, काही यूजर्सनी तिला ‘नॅशनल क्रश’ असं म्हणण्यास सुरुवात केली आहे.

यापूर्वी रश्मिका मंदाना, प्रिया प्रकाश वारियर, तृप्ती डिमरी आणि मराठी अभिनेत्री गिरीजा ओक यांसारख्या अभिनेत्रींच्या नावाशीही सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ हा शब्द जोडला गेला आहे. आता तान्या मिश्रा या यादीत चर्चेत आली आहे. मात्र ‘नॅशनल क्रश’ हा कोणताही अधिकृत किताब नसून सोशल मीडिया यूजर्सकडून दिला जाणारा अनौपचारिक टॅग आहे.

सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

तान्या मिश्रा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सध्या चर्चेत आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मोठा चाहतावर्ग असून सुमारे 12 लाख लोक तिला फॉलो करतात. तिच्या काही फोटो आणि व्हिडीओंवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

कोण आहे ही तान्या मिश्रा?

तान्या केवळ मॉडेलिंगपुरती मर्यादित नाही. तिने अभिनय क्षेत्रातही काम केलं आहे. ‘गजनवी’ आणि ‘चेज’ या चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. तसेच ‘चिड़िया उड़’ या वेब सीरिजमध्येही तिने भूमिका साकारली आहे. आता ती ‘सफर मोहब्बत का’ या आगामी म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार असल्याची माहिती आहे.

तान्या मिश्रा मूळची बिहारमधील गया येथील आहे. तिचा जन्म 31 जानेवारी 1999 रोजी झाला. तिने मगध विद्यापीठातून बी.कॉमचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने मॉडेलिंगच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. फेमिना, फिल्मफेअर आणि ग्राझिया यांसारख्या प्रसिद्ध मासिकांसाठी तिने फोटोशूट केले आहेत.

एप्रिल-मे 2014 मध्ये फेमिना मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकल्यानंतर तिला विशेष ओळख मिळाली. पुढे 2019 मध्ये तिने IAWA मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला आणि चौथी उपविजेती ठरली. त्यानंतर मॉडेलिंगसोबत अभिनय क्षेत्रातही तिने काम सुरू ठेवलं. सध्या व्हायरल फोटोंमुळे तान्या मिश्रा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >