Navi Mumbai News: नवी मुंबईमध्ये साथीच्या आजारांचा कहर, शहरात डेंग्यू-मलेरियाचे किती रूग्ण? आकडेवारी जाहीर

नवी मुंबईतील तळोजा परिसरामध्ये डेंग्यु आणि मलेरियाच्या रूग्णांची झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. महापालिकेने रुग्णांचा आकडा जाहीर केला आहे.

नवी मुंबई: नवी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईतील तळोजा परिसरामध्ये डेंग्यु आणि मलेरियाच्या रूग्णांची झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये साथीचे आजार डोकं वर काढताना पाहायला मिळते. अस्वच्छता, न वाहतं पाणी यांसह अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे साथीचे आजार नागरिकांना होताना दिसतात. नवी मुंबईतील तळोजाच्या शहरी आणि ग्रामीण परिसरामध्ये दुर्गंधीमुळे अनेक नागरिकांना डेंग्यु आणि मलेरियाची लागण झालेले पाहायला मिळत आहे.






गेल्या काही महिन्यांपासून, तळोजा शहर आणि लगतच्या ग्रामीण भागात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे वेगाने विकसित होणाऱ्या या परिसरामध्ये डासांमुळे होणाऱ्या आजारांविषयी नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जून ते ऑगस्ट दरम्यान डेंग्यू आणि मलेरियाचे 20 रुग्ण आढळून आले आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत तपासलेल्या 183 डेंग्यू संशयित रुग्णांपैकी आठ जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे, 4103 रहिवाशांची मलेरिया चाचणी करण्यात आली, त्यापैकी 12 जणांना मलेरियाची लागण झाल्याचे आढळून आले, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.






नवी मुंबईतील तळोजामध्ये झपाट्याने विकासकामे होताना पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिक या परिसरामध्ये स्थलांतरित होताना दिसत आहेत. तळोजाचा झपाट्याने होणारा विस्तार, मोठ्या प्रमाणावरील बांधकाम, अनेक ठिकाणी साचलेले पाणी आणि अस्वच्छता यांमुळे साथीचे आजार डोकं वर काढताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येताना दिसत आहे. त्यामुळे तळोजाच्या शहरी आणि ग्रामीण परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अधिक तीव्र निगराणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी बांधकाम स्थळांवर पाणी साचू नये याची खात्री करणे, गटारे- नाले नियमितपणे स्वच्छ करणे, डासांच्या प्रजननाची ठिकाणे नष्ट करणे, धूर फवारणी आणि कीटकनाशक फवारणी करणे या कामावर महापालिकेकडून विशेष लक्ष दिले जात आहे.






इतकंच नाही तर, रोगांचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून जनजागृती मोहीम देखील राबवली जात आहे. "डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि मोहिमा राबवल्या जात आहेत. रुग्णांची माहिती गोळा करण्यासाठी आरोग्य कर्मचारी आणि निरीक्षक खासगी रुग्णालयांनाही भेटी देत ​​आहेत. जिथे जिथे रुग्ण आढळले आहेत, तिथे तापाची पाहणी, धूर फवारणी आणि कीटकनाशक फवारणी केली जात आहे," असे पनवेल महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ब्रिटनचे प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन यांच्या भारत दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल

मुंबई: ब्रिटनचे प्रिन्स विलियम (Prince William) आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन (Kate Middleton) हे पुढच्या तीन दिवसांसाठी

ठाणे जिल्ह्यातील कोतवाल भरती परीक्षेची तारीख बदलली; आता या दिवशी होणार परीक्षा, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी

Mumbai Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक पुन्हा एकदा उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आल्याने

Mumbai 26/11 attack : मुंबईतील २६/११ च्या नरिमन हाऊसची रेकी केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक

मुंबई : मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या कुलाबा येथील नरिमन हाऊससह शहरातील काही

BMC Revenue: महापालिकेच्या महसूलात तबबल 815 कोटींनी होणार वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेचा महसूल वाढवण्याच्यादृष्टीकोनातून लिलाव पध्दतीने भूखंड भाडेकरारावर

Sion Hospital: महापालिकेच्या शीव रुग्णालयात अतिरिक्त ड्युअल एनर्जी सी.टी.स्कॅनची सुविधा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): रुग्णांच्या आजारांसाठी तसेच विविध रोगांचे निदान करण्यासाठी डयुअल एनर्जी सी.टी. स्कॅनचा