Asha Bhosle : गाणं प्रचंड लोकप्रिय ! गाण्यासाठी आशा भोसले यांनी श्वास रोखला होता, पण रेडिओवर झालं होतं बॅन

Asha Bhosle: हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार गाण्यांचा विषय निघाला की आशा भोसले यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या आवाजातील विविध छटा, वेगवेगळे प्रयोग आणि गायकीच्या अनोख्या शैलीमुळे त्यांनी अनेक गाणी अजरामर केली. त्यांच्या अशाच एका गाण्यामागचा किस्सा आजही तितकाच चर्चेत आहे. १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील ‘दम मारो दम’ हे गाणं आजही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि कल्ट गाण्यांपैकी एक मानलं जातं. देव आनंद आणि झीनत अमान यांच्या या चित्रपटाला या गाण्यामुळे विशेष ओळख मिळाली.



‘दम मारो दम’साठी आशा भोसले यांचा अनोखा प्रयोग


‘दम मारो दम’ या गाण्याला आर. डी. बर्मन म्हणजेच पंचम दा यांनी संगीत दिलं होतं, तर गीतकार आनंद बक्षी होते. गाण्यात झीनत अमान यांचा हिप्पी संस्कृतीची छटा असलेला लूक आणि त्या काळातील तरुणाईला आकर्षित करणारी वेगळी शैली पाहायला मिळाली.गाण्याच्या आवाजात एक प्रकारचा नशा, जडपणा आणि ठहराव जाणवावा, अशी आर. डी. बर्मन यांची अपेक्षा होती. हा परिणाम साधण्यासाठी आशा भोसले यांनी आपल्या आवाजावर वेगळ्या पद्धतीने नियंत्रण मिळवलं. माहितीनुसार, या गाण्याच्या रेकॉर्डिंगपूर्वी आशा भोसले यांनी सुमारे सहा मिनिटे श्वास रोखण्याचा सराव केला होता. आवाजात हवा आणि श्वासाचा परिणाम कमी ठेवून अपेक्षित ‘हेवी’ टोन साधण्याचा हा प्रयोग गाण्याच्या वैशिष्ट्यांपैकी एक ठरला.



१२ आठवडे नंबर वन


गाणं प्रदर्शित झाल्यानंतर काही काळातच ‘दम मारो दम’ची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. आशा भोसले यांचा आवाज, आर. डी. बर्मन यांची धून आणि पडद्यावरील झीनत अमान यांची स्टाइल यामुळे हे गाणं विशेषतः तरुणांमध्ये गाजलं.१९७२ मध्ये ‘बिनाका गीतमाला’च्या वार्षिक यादीत हे गाणं अव्वल ठरलं. याशिवाय हे गाणं तब्बल १२ आठवडे पहिल्या क्रमांकावर राहिल्याचाही उल्लेख केला जातो. त्यामुळे ‘दम मारो दम’ने त्या काळातील लोकप्रिय संगीतामध्ये वेगळं स्थान निर्माण केलं.



लोकप्रियतेसोबतच वादही निर्माण झाला


गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळत असतानाच त्याच्या आशयावरून वादही निर्माण झाला. गाण्यात नशा आणि ड्रग्सशी संबंधित संदर्भ असल्याने त्याचा तरुणांवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली होती.याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया रेडिओवर हे गाणं काही काळ प्रसारित करण्यात आलं नसल्याचं सांगितलं जातं. आशा भोसले यांनी एका जुन्या मुलाखतीतही या गाण्यावर सरकारी पातळीवर बंदी घालण्यात आल्याचा उल्लेख केला होता. तसेच दूरदर्शनवर ‘हरे रामा हरे कृष्णा’ चित्रपट दाखवताना हे गाणं कट केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.



आजही कायम आहे गाण्याची क्रेझ


रिलीज होऊन अनेक दशकं उलटली असली तरी ‘दम मारो दम’ची लोकप्रियता आजही कायम आहे. गाण्याची वेगळी धून, आशा भोसले यांचा दमदार आवाज, आर. डी. बर्मन यांचं प्रयोगशील संगीत आणि झीनत अमान यांची पडद्यावरील शैली यामुळे हे गाणं हिंदी चित्रपटसंगीताच्या इतिहासातील एक लक्षवेधी गाणं ठरलं आहे.

Comments
Add Comment

Drishyam 3 : ‘दृश्यम 3’च्या ॲडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद, रिलीजआधीच कोट्यवधींची कमाई

Drishyam 3 : अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘दृश्यम 3’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. ‘दृश्यम: द

Prahaar Movie : ‘प्रहार’ चित्रपटाच्या ट्रेलरचा अनावरण सोहळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष उपस्थिती

मुंबई : ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र

Jubin Nautiyal: 37 व्या वर्षी प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर बाबा झाला, गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला गोंडस बाळाचा जन्म

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर जुबिन नौटियाल बाबा झाला आहे. वयाच्या 37 व्या वर्षी गायक बाबा झाला आहे. जुबिनची पत्नी

Drishyam 3 : दृश्यम 3 पाहा अन् फ्री पावभाजी खा! पण ‘ही’ अट लक्षात ठेवा

मुंबई : अभिनेता अजय देवगणच्या  (Ajay Devgan) बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3’ची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ‘Drishyam: The Conclusion’ हा

Model Tanya Mishra : कोण आहे तान्या मिश्रा? सोशल मीडियावर व्हायरल फोटोमुळे ‘नॅशनल क्रश’ची चर्चा

सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री आणि मॉडेल तान्या मिश्रा (Tanya) हिची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तान्याचे

Box Office Collection: सिद्धार्थ-तमन्नाच्या ‘द वन’ आणि नानीच्या ‘द पॅराडाईज’ चित्रपटाची कोट्यवधींची कमाई!

मुंबई: चित्रपटांच्या विश्वात सध्या बॉक्स ऑफिसवर सुगीचे दिन सुरू असून, प्रेक्षकांचा चित्रपत्रांना भरघोस