Mumbai News: बोरिवलीत अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई, अतिक्रमण विभागाने 20 बांधकामे आणि 15 स्टॉल्स केले निष्कासित

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सर्व संबंधित यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार मुंबईतील पादचाऱ्यांना अडथळामुक्त, सुरक्षित व सलग पदपथ उपलब्ध करून देण्यासाठी पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणे व बांधकामे हटविण्याची मोहीम सुरू आहे. या अभियान अंतर्गत आर (मध्य) विभागातील बोरिवली (पश्चिम) परिसरात 20 अनधिकृत बांधकामे आणि 15 अनधिकृत स्टॉल्सवर 29 सप्टेंबर 2026 रोजी कारवाई करण्यात आली.



उपायुक्त (परिमंडळ 7) मनीष वळंजु यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (आर मध्य विभाग) डॉ. प्रफुल तांबे यांच्या नेतृत्वात संबंधित अधिकारी-कर्मचारी व कामगारांच्या पथकाने ही कारवाई केली. बोरिवली पश्चिम येथील लोकमान्य टिळक रोड, मार्केट लेन आणि बोरिवली सबवे रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. ‘पादचारी प्रथम’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात बोरिवली परिसरातील 6 पदपथांवरील एकूण सुमारे 8 किलोमीटर परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.



या कारवाईमुळे बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना तसेच परिसरातील पादचाऱ्यांना अडथळामुक्त व अधिक मोकळे पदपथ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या कारवाईसाठी मुंबई महानगरपालिकेकडून 2 जेसीबी, 5 डंपर, 10 हून अधिक अधिकारी-कर्मचारी आणि 20 कामगार तैनात करण्यात आले होते. तसेच कारवाईदरम्यान आवश्यक पोलीस बंदोबस्तासाठी 15 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
Comments
Add Comment

Powai Lake: पवई तलावांत जाणारे सांडपाणी १०० टक्के बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पवई तलावात मिसळणाऱ मलजलाच्या २० प्रवाहांना ‘इंटरसेप्ट’ करून ते भांडुप मलजल प्रक्रिया

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमास मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल २ लाख ५९ हजारांहून अधिक भाविक, नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमयी वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी

Ganesh Idols Immersion: कृत्रिम तलावांमध्ये तब्बल 97 टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन, मुंबई महानगरपालिकेचा दावा

मुुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईकर श्रीगणेशभक्त आणि श्रीगणेश मंडळांनी उदंड प्रतिसाद देत तब्बल 97.27 टक्के

BMC News : मुंबईत ७० वर्षांवरील ज्येष्ठांना आयुष्यमान वय वंदना कार्ड; एमडीसी अभियानाचा २ ऑक्टोबरपासून शुभारंभ,महापालिकेच्यावतीने १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट (एमडीसी) अभियान १०० दिवसांच्या कालावधीसाठी राबविण्यात

BMC : मागील २८ दिवसांमध्ये अस्वच्छता करणाऱ्यांकडून १८.७० लाखांचा दंड वसूल; तब्बल १,३३६ प्रकरणांमध्ये महापालिकेने केली दंडात्मक कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने १ ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन उपविधी, २०२५

सुट्टीच्या काळात प्रवाशांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेकडून मुंबई - मडगांव आणि मुंबई - नागपूर दरम्यान 8 विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : सणासुदीच्या आणि सुट्टीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने