मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराबाबत विविध मागण्यांसाठी २ ऑक्टोबर रोजी पुण्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेल्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन स्थगित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत प्रक्रिया सुरू करण्याबरोबरच सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली, प्रमुख अधिकाऱ्यांची चौकशी आणि यावर्षी रिक्त पदे भरण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला.
Ashok Kharat Case : अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि अघोरी कृत्ये करणाऱ्या अशोक खरातच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीय. राज्यभर चर्चेत असलेला भोंदू अशोककुमार खरात ...
एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. अध्यक्षांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तसेच अध्यक्षांचा राजीनामा होण्यापूर्वी संबंधित प्रकरणाची तीन महिन्यांत न्यायालयीन चौकशी केली जाणार असल्याचे आश्वासन मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. काही प्रमुख अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे.
एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आश्वासनही विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. आयोगाच्या कामकाजाशी संबंधित अधिकाऱ्यांबाबतही आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. परीक्षा पद्धतीबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससीच्या आगामी सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. परीक्षेसंदर्भात ‘सिंगल कार्ड’ यंत्रणा उभारण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.
नवी मुंबई : अंमली पदार्थांच्या अवैध विक्री आणि तस्कराविरुद्ध नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी विविध २०१ ...
कृषी सेवेच्या पेपरच्या तपासणीबाबतही विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. या पेपरची तपासणी केली जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तसेच यावर्षी विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.






