Duronto Express : CSMT यार्डमध्ये दुरंतो एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारला आग; ट्रेनच्या वेळेत बदल

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील यार्डमध्ये बुधवारी पहाटे सीएसएमटी-हावडा दुरंतो एक्सप्रेसच्या रिकाम्या रेकमधील पॅन्ट्री कारला आग लागल्याची घटना घडली. ट्रेन क्रमांक 12261 च्या SCR/192967 क्रमांकाच्या पॅन्ट्री कारमध्ये ही आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील यार्डमध्ये बुधवारी पहाटे सीएसएमटी-हावडा दुरंतो एक्सप्रेसच्या रिकाम्या रेकमधील पॅन्ट्री कारला आग लागल्याची घटना घडली. ट्रेन क्रमांक 12261 च्या SCR/192967 क्रमांकाच्या पॅन्ट्री कारमध्ये ही आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे सुमारे 3:40 वाजता पॅन्ट्री कारमधून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान पहाटे 4:01 वाजता घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्काळ आग विझवण्याचे काम सुरू केले आणि अवघ्या काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. (Train Fire)






सुदैवाने प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली


आग लागली त्यावेळी ट्रेनचा रेक यार्डमध्ये रिकामा होता. त्यामुळे पॅन्ट्री कारमध्ये कोणताही प्रवासी उपस्थित नव्हता. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आग विझवताना पॅन्ट्री कारमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच परिसरात काही काळ गर्दीही झाली होती. ( Howrah Duronto Express)



ट्रेनच्या वेळेत बदल


दरम्यान, या आगीच्या घटनेचा परिणाम हावडा दुरंतो एक्सप्रेसच्या नियोजित वेळेवर झाला. ही ट्रेन 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:15 वाजता CSMT येथून हावड्याच्या दिशेने रवाना होणार होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने ट्रेनच्या वेळेत बदल केला.


मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 12261 CSMT-हावडा दुरंतो एक्सप्रेस आता 30 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता रवाना होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी ट्रेनच्या सुधारित वेळेची माहिती तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान, पॅन्ट्री कारला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. रेल्वे प्रशासनाकडून घटनेची पुढील चौकशी केली जात आहे.

Comments
Add Comment

ब्रिटनचे प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन यांच्या भारत दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल

मुंबई: ब्रिटनचे प्रिन्स विलियम (Prince William) आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन (Kate Middleton) हे पुढच्या तीन दिवसांसाठी

ठाणे जिल्ह्यातील कोतवाल भरती परीक्षेची तारीख बदलली; आता या दिवशी होणार परीक्षा, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी

Mumbai Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक पुन्हा एकदा उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आल्याने

Mumbai 26/11 attack : मुंबईतील २६/११ च्या नरिमन हाऊसची रेकी केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक

मुंबई : मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या कुलाबा येथील नरिमन हाऊससह शहरातील काही

BMC Revenue: महापालिकेच्या महसूलात तबबल 815 कोटींनी होणार वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेचा महसूल वाढवण्याच्यादृष्टीकोनातून लिलाव पध्दतीने भूखंड भाडेकरारावर

Sion Hospital: महापालिकेच्या शीव रुग्णालयात अतिरिक्त ड्युअल एनर्जी सी.टी.स्कॅनची सुविधा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): रुग्णांच्या आजारांसाठी तसेच विविध रोगांचे निदान करण्यासाठी डयुअल एनर्जी सी.टी. स्कॅनचा