Wednesday, September 30, 2026

भारताविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात जस्टिन ग्रीव्ह्सने शतक ठोकलं, आता संघातून केलं बाहेर; झालं असं की...

भारताविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात जस्टिन ग्रीव्ह्सने शतक ठोकलं, आता संघातून केलं बाहेर; झालं असं की...
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 8 गडी राखून पराभूत केलं. वेस्ट इंडिजने विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं होतं. जस्टिन ग्रीव्ह्सच्या शतकी खेळीमुळे हे शक्य झालं होतं. पण आता दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला मोठा धक्का बसला आहे. त्याला शतकी खेळीच महागात पडली, असं म्हणावं लागेल. म्हणजेच पहिल्या वनडे सामन्यात 101 धावांची खेळी करत असताना जस्टिन ग्रीव्ह्सला दुखापत झाली होती. त्याच्या पोटरीला वेदला होत होता. त्यामुळे या खेळीदरम्यान वैद्यकीय टीमने मैदानात येऊन त्याची तपासणीही केली होती. मात्र त्याची दुखापत कायम असल्यामुळे गुवाहाटीत वनडे सामना खेळणार नाही. ग्रीव्ह्सच असं अचानक संघातून बाद होणं वेस्ट इंडिजसाठी धक्का आहे. कारण त्याने पहिल्या वनडे सामन्यात फक्त शतक ठोकलं नाही. तर पहिल्या विकेटसाठी जॉन कॅम्पबेलसोबत 135 धावांची भागीदारीही केली होती. वनडे मालिकेतील दुसरा सामना वेस्ट इंडिजसाठी करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात पराभव झाला तर मालिका गमवावी लागेल. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिज संघ सर्वस्वी पणाला लावेल यात काही शंका नाही. दुसरीकडे, ग्रीव्हसच्या जागी प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता आहे. असं असताना वेस्ट इंडिज संघाकडे शेर्फेन रदरफोर्डचा पर्याय आहे. त्याला दुसऱ्या वनडे सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या वनडे सामन्यात त्याला संधी मिळाली नव्हती. रदरफोर्ड मधळ्या फळीत फलंदाजी करतो. ग्रीव्ह्सच्या अनुपस्थितीमुळे वेस्ट इंडिज संघाला मोठा धक्का असून त्यांच्या सलामीच्या जोडीत बदल करावा लागणार आहे. गुवाहाटीत जॉन कॅम्पबेलसोबत केसी कार्टी ओपनिंगला येऊ शकतो.
गुवाहाटी येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्याला तर जस्टीन ग्रीव्ह्स मुकणार आहेच, पण 3 ऑक्टोबर रोजी न्यू चंदीगड येथे होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यातही तो खेळू शकेल की नाही, याबाबत साशंकता आहे. वेस्ट इंडिजची अशी आहे प्लेइंग 11:  जॉन कॅम्पबेल, केसी कार्टी, शाई होप (कर्णधार), अमीर जांगू, शेर्फेन रदरफोर्ड, रॉस्टन चेस, कीमो पॉल, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, जेडन सील्स, विटेल लॉज
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >