Sunday, November 15, 2026

India vs New Zealand: टीम इंडियाचा थरारक विजय! न्यूझीलंडला 22 धावांनी नमवत वनडे मालिका जिंकली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेचा शेवट अत्यंत रोमांचक झाला आहे. मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत न्यूझीलंडचा 22 धावांनी पराभव केल आहे. या विजयामुळे भारताने 3-1 अशा फरकाने वनडे मालिका आपल्या नावावर केली आहे.

भारत : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेचा शेवट अत्यंत रोमांचक झाला आहे. मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत न्यूझीलंडचा 22 धावांनी पराभव केल आहे. या विजयामुळे भारताने 3-1 अशा फरकाने वनडे मालिका आपल्या नावावर केली आहे.

दोन्ही संघांमध्ये पाचव्या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. मात्र, भारतीय फलंदाजांना न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी रोखून धरले. त्यामुळे टीम इंडियाचा डाव 209  धावांवर आटोपला. कमी धावसंख्येमुळे न्यूझीलंडचा विजय सहज होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

मात्र, 210  धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी मोठा धक्का दिला. सुरुवातीपासूनच अचूक टप्प्यावर आणि भेदक मारा करत भारतीय गोलंदाजांनी किवी फलंदाजांवर दबाव निर्माण केला. एकामागून एक विकेट घेत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. सामन्यातील रंगत ही शेवटपर्यंत कायम राहून न्यूझीलंडचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतानाच भारतीय गोलंदाजांनी सामन्याचे चित्र पालटले. अखेर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 187 धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताने हा सामना 22 धावांनी जिंकत मालिकेचा शेवट विजयाने केला.

कमी धावसंख्येच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दाखवलेली जिद्द आणि सांघिक कामगिरी निर्णायक ठरली. या विजयामुळे टीम इंडियाने पाच सामन्यांची वनडे मालिका 3-1 अशा फरकाने जिंकत न्यूझीलंडवर आपले वर्चस्व सिद्ध केले.

माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा 22 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. चौथ्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने या निर्णायक लढतीत शानदार पुनरागमन करत गोलंदाजीच्या जोरावर विजय संपादन केला.

सामन्याचा नाणेफेक न्यूझीलंडने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात संमिश्र राहिली आणि संपूर्ण संघ 42.1  षटकांत 209 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून इशान किशनने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली, तर अक्षर पटेलनेही महत्त्वपूर्ण 46 धावांचे योगदान देत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. कर्णधार श्रेयस अय्यर (22) आणि नमन धीर (22) यांनीही उपयुक्त धावा केल्या. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी 3 बळी घेत भारतीय फलंदाजांना रोखले.

210  धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारतीय वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा सामना करणे कठीण गेले. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 48.1  षटकांत 187 धावांवर गारद झाला. यजमान संघाकडून डीन फॉक्सक्रॉफ्टने सर्वाधिक 31 धावा केल्या, तर निक केली आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 24 धावांचे योगदान दिले.

भारताच्या विजयात गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. अर्शदीप सिंगने 10 षटकांत अवघ्या 30 धावा देत 3 महत्त्वपूर्ण बळी घेतले, ज्यासाठी त्याला 'सामनावीर' पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याला मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2  बळी घेत उत्तम साथ दिली. तसेच यश ठाकूर, आकिब नबी आणि नमन धीर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. अखेरच्या षटकांत अक्षर पटेलने ब्लेअर टिकनरला यष्टीचीत करत भारताच्या ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >