43 वर्षांनी असं घडलं
वनडे क्रिकेट इतिहासात वेस्ट इंडिजची भारताविरुद्धची सर्वोच्च खेळी केली. यापूर्वी वेस्ट इंडिजने 1983 मध्ये भारताविरुद्ध 333 धावा केल्या होत्या. तेव्हा वेस्ट इंडिजने बाजी मारली होती. आता 43 वर्षांनी वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या केली आहे. पण 2002 पासूनचा 300पार धावांचा जेव्हा कधी वेस्ट इंडिजने पल्ला गाठला तेव्हा भारताने विजय मिळवला आहे. 2002 ध्ये वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 324 धावा ठेवल्या होत्या. तेव्हा भारताने विजय मिळवला होता. 2007 मध्ये वेस्ट इंडिजने 324 आणि 2018 मध्ये 322 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. तेव्हाही भारतानेच विजय मिळवला होता. आता भारतीय संघ दिलेलं लक्ष्य गाठणार का? याकडे लक्ष लागून आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचं नशिब 38व्या वर्षी फळफळलं आहे. कारण त्याने या वयात नव्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. पंजाब त्याला तिन्ही ...
भारताविरुद्ध सर्वोच्च धावा
वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजीवर वर्चस्व गाजवत प्रतिस्पर्धी संघांनी रचलेले हे पाच सर्वोच्च धावसंख्यांचे विक्रम आहेत. यात दक्षिण आफ्रिकेने 2015 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 4 गडी गमवून 438 धावा कुटत अव्वल स्थान पटकावले आहे. यानंतर श्रीलंकेने 2009 मध्ये राजकोट येथे 8 विकेट गमवून 411 धावांचा डोंगर उभा केला होता. आता वेस्ट इंडिजने गुवाहाटी येथे 7 गडी गमवून 405 धावांचा विशाल स्कोअर उभारून या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. तर ऑस्ट्रेलियाने 2020 मध्ये सिडनी येथे 4 गडी गमवून 389 धावा ठोकल्या होत्या. या दिग्गज संघांच्या पंक्तीत इंग्लंडनेही 2026 मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर 3 गडी गमवून 387 धावांची तुफानी खेळी करत भारतीय संघाविरुद्ध आपले सर्वोच्च आव्हान उभे केले होते.