वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात दुसरा वनडे सामना गुवाहाटीत सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या सामन्यातही वेस्ट इंडिजने दमदार सुरूवात केली. जस्टीन ग्रीव्ह्स या सामन्यात दुखापतीमुळे खेळत नाही. पण त्याची उणीव जॉन कॅम्पबेलने जराही भासू दिली नाही. त्याने भारताविरुद्ध झंझावाती शतक ठोकलं. 29 चेंडूत अर्धशतक ठोकल्यानंतर त्याने 35 चेंडूत आणखी 50 धावा जोडत शतक पूर्ण केलं. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील दुसरं शतक ठोकलं आहे. जॉन कॅम्पबेलने आपल्या आक्रमक खेलीने प्रसिद्ध कृष्णा, आकिब नबी आणि गुरनूर ब्रार यांची धुलाई केली. फिरकीपटू कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनाही त्याने सडलं नाही. प्रसिद्ध कृष्णाच्या एकाच षटकात 22 धावाही ठोकल्या. 65 चेंडूत शतक ठोकल्याने त्याच्या नावावर विक्रमाची नोंदही झाली आहे. पण वेस्ट इंडिज संघातील त्याचा प्रवास सोपा नव्हता. त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती. नेमकं काय झालं होतं ते जाणून घ्या..
जॉन कॅम्पबेलवर का घातली होती बंदी?
जॉन कॅम्पबेल हा एक उत्तम फलंदाज आहे. पण 2022 मध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला उतरती कला लागली. एप्रिल 2022 मध्ये डोपिंग कंट्रोल अधिकाऱ्याला त्याने रक्ताचे नमुने देण्यात नकार दिला. त्यानंतर जमैकाच्या अँटी डोपिंग कमिशनने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातली होती. पण कोर्टात दाद मागितल्यानंतर त्याच्यावरी बंदीची मर्यादा 22 महिन्यांवर आणली गेली. ऑगस्ट 2024 मध्ये त्याच्यावरील बंदी उठली. पण जॉन कॅम्पबेल सुपर 50 च्या अंतिम सामन्यात नाणेफेकीसाठी आलाच नाही. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा एकदा चार सामन्यांची बंदी घातली गेली.
भारताविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात जस्टिन ग्रीव्ह्सने शतक ठोकलं, आता संघातून केलं बाहेर; झालं असं की...
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 8 गडी राखून पराभूत केलं. वेस्ट ...
देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर पुनरागमन
जॉन कॅम्पबेलने
देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे त्याची पुन्हा एकदा वेस्ट इंडिज संघात निवड झाली. त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. पहिल्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या वनडे सामन्यात शतक ठोकून आपला फॉर्म दाखवून दिला आहे. कॅम्पबेलने सात वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये शतक ठोकलं आहे. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक 2019 मध्ये आयर्लंडविरुद्ध ठोकलं होतं.