भारताचा ऐतिहासिक विजय, वेस्ट इंडिजविरुद्ध 406 धावांचं विजयी लक्ष्य गाठलं

भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. वेस्ट इंडिजने विजयासाठी 406 धावांच आव्हान ठेवलं होतं. हे लक्ष्य तसं कठीण होतं. पण कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्माच्या झंझावाती खेळीमुळे हा विजय सोपा झाला. दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण वेस्ट इंडिजने 50 षटकात 7 गडी गमवून 405 धावा केल्या आणि विजयासाठी 406 धावांचं आव्हान ठेवलं. खरं तर हे खूपच कठीण आव्हान होतं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची कामगिरी कशी असेल? याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये संभ्रम होता. मात्र कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी 255 धावांची भागीदारी केली. 158 चेंडूत 255 धावा केल्याने वेस्ट इंडिजचा संघ बॅकफूटवर गेला.(IND VS WI)



रोहित शर्मा बाद झाल्यानंतरही शुभमन गिलने किल्ला लढवणं सुरूच ठेवलं. त्याला विराट कोहली साथ मिळाली. शुभमन गिलने या दरम्यान दीड शतकी खेळी आणि द्विशतकाच्या दिशेने कूच केली. शुभमन गिलच्या प्रत्येक फटक्यावर वेस्ट इंडिजच्या हातून विजय निसटत गेला. वनडे क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने पहिल्यांदाच 400 पेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे. यापूर्वी भारताचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. तेव्हा भारताने 360 धावांचे लक्ष्य गाठले होते.



भारतामध्ये कोणत्याही संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात गाठलेले हे सर्वात मोठे विजयी लक्ष्य ठरले आहे. यापूर्वी जयपूर 2013 मध्ये भारताने आणि रायपूरमध्ये 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेने 360 धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या गाठले होते. जागतिक पातळीवर एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी चेझ ठरला आहे. 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 435 धावांचे लक्ष्य गाठून अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर आता भारताने 400 हून अधिक धावा करून इतिहास रचला आहे.



एकाच सामन्यात ५ शतकांचा विक्रम


या सामन्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही संघांच्या मिळून तब्बल 5 फलंदाजांनी शतके झळकावली. वेस्ट इंडिजकडून जॉन कॅम्पबेल (101), शाय होप (104) आणि अमीर जांगू (114) यांनी शतके झळकावली, तर भारताकडून रोहित शर्मा (101) आणि शुभमन गिल (द्विशतक) यांनी शतके केली.



भारताचा दणदणीत विजय; वेस्ट इंडिजवर 8 विकेट्सने मात


भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 405 धावा उभारून भारतासमोर मोठे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारतीय फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत हे आव्हान सहज पार केले.



गिलची विक्रमी खेळी


भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला शुभमन गिल. गिलने शानदार द्विशतकी खेळी करत 223 धावा फटकावल्या. त्याला रोहित शर्माची दमदार साथ मिळाली. भारताने अवघ्या 43.3 षटकांत 406 धावांचे लक्ष्य गाठत सामना आपल्या नावावर केला.



मालिकेत भारताची आघाडी


या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजने उभारलेल्या 405 धावांच्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत भारताने आपली फलंदाजीची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली.(IND VS WI)

Comments
Add Comment

शुभमन गिलची बॅट पुन्हा चमकली! ODI मध्ये 200 धावा; पाठलाग करताना द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई फलंदाज

नवी दिल्ली: संपूर्ण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला आहे. कर्णधार शुभमन गिलने आपल्या खेळीने

रोहित शर्माचा वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना दणका, शतकी खेळीसह वर्ल्डकपसाठी ठोकला दावा

वेस्ट इंडिजने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला 405 धावांचं मोठं आव्हान दिलं आहे. या धावांचा पाठलाग करताना भारतीय

ICC ODI Rankings : विराट कोहली दुसऱ्या स्थानावर झेप घेत शुभमन गिलच्या अगदी जवळ; कुलदीप यादव टॉप 5 मध्ये

आयसीसीच्या नवीन पुरुष एकदिवसीय फलंदाजी आणि गोलंदाजी क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी शानदार मुसंडी मारली आहे.

कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, वेस्ट इंडिजविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात ठोकलं शतक

भारताचा कर्णधार शुभमन गिल याने 405 या धावांचा पाठलाग करताना कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने वेस्ट इंडिजच्या

Asian Games 2026 : भारत-श्रीलंका उपांत्य सामना; कोण गाठणार फायनल?

नागोया (जपान) : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाने थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा 11वा दिवस भारताचा, आर्चरी आणि शूटिंगमध्ये सुवर्णवेध; तर बॉक्सिंगमध्ये बसणार गोल्डन पंच

नागोया : 2026 च्या आशियाई खेळांच्या 11व्या दिवशी भारताच्या खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी करत क्रीडा जगतात भारताचा