नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातल्या दुसऱ्या स्लीपर वंदे भारत ट्रेनला मंजुरी मिळाली आहे. ही हायस्पीड स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस वाराणसी ते नवी दिल्ली स्थानकादरम्यान धावणार आहे. या ट्रेनला कानपुर सेंट्रल आणि प्रयागराज अशा दोन स्थानकांवर थांबा असणार आहे. या स्पेशल हायस्पीड ट्रेनमुळे पुर्वांचल, मध्य उत्तर प्रदेश आणि कानपूर या परिसरातील प्रवाशांना दिल्ली आणि वाराणसी दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे.
पश्चिम आशियातील युद्धाच्या भडकलेल्या ज्वालांमधेच एका आंतरराष्ट्रीय विमानाबाबत अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. संयुक्त अरब अमिरातीतील दुबई ...
प्रस्तावित वेळापत्रकानुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेन वाराणसी स्थानकावरून रात्री 8.40 वाजता सुटेल, रात्री 10.05 वाजता प्रयागराजला, रात्री 11.50 वाजता कानपूर सेंट्रलला पोहोचेल. त्यानंतर ही ट्रेन पहाटे सुमारे 4.50 वाजता नवी दिल्लीत पोहोचेल. वाराणसी ते दिल्ली या प्रवासाला अंदाजे 8 तास 10 मिनिटांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. परतीच्या प्रवासासाठी ही ट्रेन नवी दिल्ली स्थानकावरून रात्री 11.25 वाजता सुटेल. ती कानपूरला मध्यरात्री 3.30 च्या सुमारास आणि प्रयागराजला पहाटे 5.38 वाजता पोहोचेल. त्यानंतर ट्रेन सकाळी 7.35 च्या सुमारास वाराणसीला पोहोचण्याची शक्यता आहे. रेल्वे बोर्डाकडून अद्याप वेळापत्रकाबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत लश्कर-ए-तोयबा (LeT) चा प्रमुख दहशतवादी मोहम्मद आसिफ उर्फ ...
पंतप्रधान कार्यालयाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या ट्रेनच्या कानपूरमधील थांब्यामुळे दिल्ली आणि वाराणसी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा महत्त्वाचा फायदा होणार आहे. कानपूर, शिवाय आसपासच्या जिल्ह्यांतील आणि मध्य उत्तर प्रदेशातील नागरिकांना जलद आणि आरामदायी रेल्वे सेवेचा लाभ मिळेल. खासदार रमेश अवस्थी यांनी कानपूरमधील ट्रेनचा थांबा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. यामुळे, उत्तर प्रदेशातील व्यापार, पर्यटन आणि आर्थिक घडामोडींना चालना मिळण्याची शक्यता आहे. शिवाय, राज्यातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
मुंबई : भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. गुजरात दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) सहकार्याने ...
प्रस्तावित ट्रेनसाठी एकूण 16 डब्बे आणि अंदाजे 823 सीट्स असण्याची शक्यता आहे. या 16 डब्ब्यांमध्ये अंदाजे 11 थर्ड एसी कोच, 4 सेकंड एसी कोच आणि शेवटचा फर्स्ट एसी कोच अशी शक्यता आहे. सुरुवातीला, ट्रेनचा कमाल वेग ताशी 130 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. नंतर हा वेग ताशी 160 किलोमीटरपर्यंत वाढवण्याची योजना आहे. ट्रेनचा स्लीपर रॅक ट्रायल रनसाठी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरात लवकर ट्रेनची चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे.