Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. या काळात उपवास, पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच नवरात्रीच्या नऊ रंगांनाही विशेष महत्त्व असते. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी ठरावीक रंगाचे कपडे परिधान करण्याची पद्धत गेल्या काही वर्षांत विशेष लोकप्रिय झाली आहे. महिला, मुली, ऑफिसमधील ग्रुप्स तसेच विविध मंडळांकडून नवरात्रीचे रंग पाळले जातात. आता पुरुषही या ट्रेंडमध्ये सहभागी होताना दिसतात. तर यंदाच्या नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी कोणता रंग कधी घालायचा? जाणून घेऊया संपूर्ण यादी...

नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग २०२६


११ ऑक्टोबर – रविवार : नारंगी

१२ ऑक्टोबर – सोमवार : पांढरा

१३ ऑक्टोबर – मंगळवार : लाल’

१४ ऑक्टोबर – बुधवार :रॉयल ब्लू

१५ ऑक्टोबर – गुरुवार : पिवळा

१६ ऑक्टोबर – शुक्रवार : हिरवा

१७ ऑक्टोबर – शनिवार : राखाडी

१८ ऑक्टोबर – रविवार : जांभळा

१९ ऑक्टोबर – सोमवार : मोरपंखी हिरवा


नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाचे कपडे का घालतात ?


नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या काळात प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग पाळण्याची परंपरा अनेक ठिकाणी लोकप्रिय आहे. त्यानुसार महिला आणि मुली नऊ दिवस त्या-त्या रंगाचे कपडे, साड्या किंवा इतर पारंपरिक पोशाख परिधान करतात. ऑफिसमध्येही नवरात्रीच्या काळात ‘नवरात्री कलर डे’ साजरा करण्याचा ट्रेंड वाढला आहे. महिला ग्रुप्सपासून ते विविध सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळांपर्यंत अनेक जण या रंगांनुसार पोशाख परिधान करतात.

नऊ रंगांचा पोशाख घालणे बंधनकारक आहे का ?


नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ठरावीक रंगांचे कपडे घालणे ही धार्मिक सक्ती नसून प्रामुख्याने परंपरा आणि उत्सवाचा एक भाग आहे. कोणता रंग घालायचा किंवा ही परंपरा पाळायची की नाही, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा आणि आवडीचा विषय आहे. नवरात्रीच्या उत्सवात या रंगांच्या माध्यमातून एकता, उत्साह आणि सामूहिक सहभाग व्यक्त केला जातो. त्यामुळे कुटुंब, मित्रमंडळी किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत एकाच रंगाचे कपडे परिधान करून नवरात्रीचा आनंद साजरा करण्याची पद्धत लोकप्रिय झाली आहे.
Comments
Add Comment

Passenger Panic : पायलटच भिडले! फ्लायदुबई विमानात गोंधळ; प्रवाशांचा आरडाओरडा, VIDEO समोर..

तेल अवीव : दुबईहून इस्रायलकडे जाणाऱ्या फ्लाईदुबईच्या बोईंग 737 विमानाच्या कॉकपिटमध्ये वैमानिकांमध्ये झालेल्या

Dubai- Tel Aviv Flight News: दुबई- तेल अवीव विमान हायजॅक नाहीच! तर विमानात भलतच घडलं; अखेर सत्य आलं समोर

नवी दिल्ली: दुबईहुन तेल अवीव विमानासंबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 'फ्लाय- दुबई' कंपनीच्या विमानामध्ये

John Campbell: रक्त न दिल्याने लादण्यात आली होती चार वर्षांची बंदी, आता जॉन कॅम्पबेलने ठोकलं शतक

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात दुसरा वनडे सामना गुवाहाटीत सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने

Ghanshyam Darode : अवघ्या 21व्या वर्षी छोटा पुढारीने घेतलं स्वतःचं घर ! चाहत्यांसोबत खास क्षण शेअर करताना घनश्याम दरोडे भावुक

Ghanshyam Darode : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेला छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे सध्या एका खास

Vivo X Fold 6 भारतात येतोय! किंमत लीक; फीचर्सही जबरदस्त

विवोने चीनमध्ये धमाकेदार लाँच केल्यानंतर आता आपल्या बहुप्रतिक्षित विवो एक्स फोल्ड 6 (Vivo X Fold 6) या फोल्डेबल

Asha Bhosle : गाणं प्रचंड लोकप्रिय ! गाण्यासाठी आशा भोसले यांनी श्वास रोखला होता, पण रेडिओवर झालं होतं बॅन

Asha Bhosle: हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार गाण्यांचा विषय निघाला की आशा भोसले यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या