Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरू धांडाची पुन्हा कमाल; कायनान चेनाईसोबत ट्रॅप मिक्स्डमध्ये सुवर्णपदक

नवी दिल्ली : भारतीय नेमबाज नीरू धांडाने 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली आहे. जपानमधील आयची-नागोया येथे झालेल्या ट्रॅप मिक्स्ड प्रकारात नीरूने कायनान चेनाईसोबत खेळताना सुवर्णपदक पटकावले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत 34 गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले.


या स्पर्धेत कतारच्या जोडीने 32 गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर चीनला 23 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय जोडीने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत सुरुवातीपासूनच आपले स्थान मजबूत ठेवले.



भारताने पहिल्या मालिकेत 6 गुण मिळवले. त्यानंतर दुसऱ्या मालिकेत एकूण गुणसंख्या 16 वर पोहोचली. तिसऱ्या मालिकेनंतर भारताच्या खात्यात 26 गुण जमा झाले. अखेर चौथ्या मालिकेत दमदार कामगिरी करत भारतीय जोडीने 34 गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले.





नीरू धांडासाठी या आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे तिसरे पदक ठरले आहे. यापूर्वी तिने महिलांच्या ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवले होते. त्यानंतर वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकत तिने विशेष कामगिरी केली होती. ट्रॅप शूटिंगमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली.


आता ट्रॅप मिक्स्ड प्रकारातील सुवर्णपदकामुळे नीरूच्या पदकांची संख्या आणखी वाढली आहे. तिच्या खात्यात वैयक्तिक प्रकारातील सुवर्णपदक, सांघिक प्रकारातील रौप्यपदक आणि मिश्र सांघिक प्रकारातील सुवर्णपदक जमा झाले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील नीरूच्या या कामगिरीमुळे भारतील नेमबाजी संघाच्या पदकसंख्तेतही भर पडली असूनस तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे क्रीडाविश्वात कौतुक होत आहे.


Comments
Add Comment

अजित आगरकर यांचा निवड समिती अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला! बीसीसीआयच्या त्या निर्णयाने चर्चेला उधाण

भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदावर गेल्या काही वर्षांपासून अजित आगरकर होते. आता त्यांच्या कार्यकाळ

Asian Games 2026 : भारताची मान उंचावली! आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजी संघाने जिंकले 'गोल्ड'

भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम

रिझवानला मोबाईलही मिळेना! पीसीबीने विश्वासघात केल्याचा दावा; नेमकं काय घडलं?

पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद रिझवान पुरता हैराण झाला आहे. इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात

WorldSkills 2026 : जागतिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका; 1 रौप्यपदकासह 3 उत्कृष्टता पुरस्कार

मुंबई : चीनमधील शांघाय येथे झालेल्या ‘वर्ल्डस्किल्स शांघाय 2026’ या जागतिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या युवा

एशियन गेम्समध्ये दहाव्या दिवशी भारताचा गोल्डन धमाका; गुलवीर सिंहची मेडल हॅटट्रिक, रिले-हाय जम्पमध्ये कांस्य

जापानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा दहावा दिवस भारतासाठी खास ठरला. भारताच्या ॲथलीट्सनी एकामागून

चेन्नईचा मास्टरस्ट्रोक; आयपीएल फायनलमध्ये धोनीला बाद करणाऱ्या स्टारची CSK मध्ये एन्ट्री!

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी दहाही फ्रेंचायीझी आपल्या उणीवा दूर करून संघ बांधणीसाठी पुढाकार घेत आहेत. त्या दृष्टीने