Wednesday, September 30, 2026

Ramayana Movie: रामायणा’मध्ये प्रभू श्री रामाच्या भूमिकेत रणबीर कपूरला का कास्ट केलं? दिग्दर्शकांनी एका वाक्यातच सांगितलं

Ramayana Movie: रामायणा’मध्ये प्रभू श्री रामाच्या भूमिकेत रणबीर कपूरला का कास्ट केलं? दिग्दर्शकांनी एका वाक्यातच सांगितलं

मुंबई: नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायणा' चित्रपटासाठी रामभक्त कमालीचे आतुर आहेत. अलीकडेच चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूरचा वाढदिवस झाला. रणबीर कपूर 4000 कोटींचा बजेट असलेल्या चित्रपटामध्ये प्रभू श्री रामाची भूमिका साकारत आहे. अभिनेत्याच्या वाढदिवशी मेकर्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने आपल्या भूमिकेसाठी केलेल्या ट्रान्सफॉर्मेशनचा एक BTS व्हिडिओ पाहायला मिळत आहे. सध्या सर्वच स्तरातून अभिनेता रणबीर कपूरचे कौतुक केले जात आहे. या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी 'रामायणा' चित्रपटासाठी रणबीर कपूरलाच का कास्ट केलंय? याचं कारण सांगितलं आहे.

कोट्यवधींचं बजेट असलेल्या 'रामायणा' चित्रपटासाठी योग्य कलाकारांची निवड करणे महत्त्वाचं होतं, अशी माहिती स्वत: दिग्दर्शकांनी दिली आहे. पुढे दिग्दर्शक नितेश तिवारी म्हणाले की, "चित्रपटामध्ये निर्मात्या नमिता मल्होत्रा यांनी रणबीरला कास्ट करण्याबद्दल चर्चा केली तेव्हा मला वाटलं की, त्याच्यासोबत आपल्याला काम करता येईल. रामाच्या भूमिकेसाठी ज्या कलागुणांची आवश्यकता आहे, ते आम्हाला रणबीरमध्ये दिसले." रणबीरने सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आपल्या भूमिकेसाठी त्याने कशापद्धतीने काम केलं, याबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेत्याने त्याच्या भूमिकेविषयी सांगितले की, त्याने 'रामायणा' चित्रपटाच्या वेळी इतर दुसऱ्या चित्रपटाचा विचार केला नाही. इतरत्र कोणत्याही भूमिकेचा त्याने त्यावेळी विचार केला नाही. 'रामायणा' चित्रपटाकडे रणबीरने फक्त एक चित्रपट आणि भूमिका म्हणून पाहिले नाही. तर, एका पूजनीय व्यक्तिरेखेला पूर्ण जबाबदारीने आणि योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने त्याने ही भूमिका स्वीकारली.

&t=6s

BTS व्हिडिओमध्ये रणबीरसह सहकलाकारांचीही झलक पाहायला मिळत आहे. चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रभू श्री रामाच्या, साई पल्लवी सीता मातेच्या, अरुण गोविल दशरथ आणि रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. व्हिडिओमध्ये, साई पल्लवी, अरूण गोविल आमि रवि दुबे या तिघांनीही रणबीरमध्ये रामाची भूमिका साकारण्यासाठी आवश्यक असलेले कोणते गुण आहेत, याबाबत प्रतिक्रिया दिली. रणबीरला 'रामायण' निर्मात्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना निर्मात्यांनी ‘ये हमारे राम हैं’असं म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. बिग बजेट असलेल्या ‘रामायण’ चित्रपटासंबंधित प्रत्येक नव्या अपडेटनंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचत आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या या BTSव्हिडीओमुळे चित्रपटातील कलाकारांच्या तयारीची आणखी एक झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.

रणबीर कपूर आणि साई पल्लवी अभिनित, ‘रामायण’ चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रणबीर कपूर- प्रभू श्री राम, साई पल्लवी- सीता माता, यश- रावण, सनी देओल- हनुमान आणि रवि दुबे- लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक तगडी स्टारकास्ट चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नमित मल्होत्रा यांच्या Prime Focus Studios, DNEG आणि यश यांच्या Monster Mind Creations यांच्या सहकार्याने हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी 2026मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी 2027मध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतात हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार असून, जगभरात IMAXमध्येही तो पाहता येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >