Wednesday, September 30, 2026

कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, वेस्ट इंडिजविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात ठोकलं शतक

कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, वेस्ट इंडिजविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात ठोकलं शतक
भारताचा कर्णधार शुभमन गिल याने 405 या धावांचा पाठलाग करताना कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत सलग दुसरं शतक ठोकलं. त्याची शतकी खेळी पाहून जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसून येत आहे. शुभमन गिलने 62 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकारांचया मदतीने 100 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 161.29 चा होता. शुभमन गिलला रोहित शर्माची साथ लाभली.  या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 200हून अधिक धावांची भागीदारी केली. ही जोडी आणखी टिकली तर आरामात 405 धावांचा पल्ला टीम इंडिया गाठू शकते.

शुभमन गिलची दिग्गजांच्या पंगतीत एन्ट्री

भारतीय भूमीवर सलग सर्वाधिक वनडे शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताच्या युवा 'प्रिन्स' शुभमन गिलने झंझावाती एन्ट्री केली आहे. शुभमन गिलने 2026 मध्ये मायदेशात सलग तीन एकदिवसीय शतके झळकावण्याचा पराक्रम करत या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. या विक्रमी यादीत अव्वल स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स असून त्याने 2010-2011 मध्ये 4 शतके , विराट कोहली 2107-2018 मध्ये 4 शतकं ठोकून संयुक्तपणे विराजमान आहेत. शुभमन गिलने आपल्या फॉर्मच्या जोरावर अवघ्या 26 व्या वर्षी मायदेशात सलग तीन शतके ठोकून दिग्गज फलंदाजांच्या पंक्तीत मानाचे स्थान मिळवले आहे. विराट कोहलीचा सलग 4 शतकांचा भारतीय विक्रम मोडण्याच्या तो अगदी जवळ पोहोचला आहे.

शुभमन गिलचं वेगवान शतक

वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या एलिट यादीत शुभमन गिलने एन्ट्री मारली आहे. गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलने अवघ्या 62 चेंडूंमध्ये झंझावाती शतक झळकावले. यासह तो भारतासाठी वनडेत संयुक्तपणे चौथे सर्वात जलद शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. त्याने केएल राहुलच्या (62 चेंडू विरुद्ध नेदरलँड, 2023) विक्रमाची बरोबरी केली आहे. या यादीत भारताचा विराट कोहली आघाडीवर आहे. त्याने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 52 चेंडूंत शतक ठोकलं होतं.शुभमन गिलचे हे 62 चेंडूंतील शतक वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेले सर्वात जलद शतक ठरले आहे. या कामगिरीसह त्याने विरेंद्र सेहवागचा 15 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. सेहवागने 2011 मध्ये इंदूर येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 69 चेंडूंत शतक ठोकले होते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >