एशियन गेम्स स्पर्धेच्या उपांत्या फेरीत भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. खरं तर हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. इशान किशनच्या झंझावाती 80 धावांमुळे भारताने 20 षटकात 169 धावांवर मजल मारली. तसेच श्रीलंकेसमोर 170 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना श्रीलंकन संघाने नांगी टाकली. श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 45 धावांवर गारद झाला. भारताने हा सामना 124 धावांनी जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली. भारताने टी20 क्रिकेटमध्ये 100हून अधिक धावांनी विजय मिळवण्याची ही 11 वी वेळ आहे. यासह भारताने कॅनडाचा विक्रम मोडीत काढला आहे. कॅनडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 वेळा 100 हून अधिक धावांनी विजय मिळवला आहे. तर दोन पूर्ण सदस्य संघांचा समावेश असलेल्या कोणत्याही पुरुष टी20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्यातील 124 धावांचा हा सर्वोच्च विजय आहे.
अभिषेक शर्माने घेतल्या सलग तीन विकेट, पण...
भारताने विजयासाठी दिलेल्या 170 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकन संघाने नांगी टाकली होती. 9 षटकात श्रीलंकेने 7 गडी गमवून 43 धावा केल्या होत्या. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने संघाचं दहावं षटक अभिषेक शर्माचं हे पहिलंच षटक होतं. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चमिका करूणारत्नेने एक धाव घेत थरिंदू रत्ननायके याला स्ट्राईक दिली. त्यानंतर त्यानेही एक धाव घेतली आणि स्ट्राईकला चमिका करूणारत्ने आला. चमिका करूणारत्ने फटका मारली आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि फसला. या गडबडीत थरिंदू रत्ननायके धावचीत झाला. त्यानंतर चमिका करूणारत्ने याने पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्नात यष्टीचीत झाली. तर बिनुरू फर्नांडोला मैदानात येताच पहिल्या चेंडूवर क्लिन बोल्ड केलं. पण पहिली विकेट धावचीत असल्याने ती खात्यात गेली नाही. त्यामुळे सलग तीन विकेट घेऊनही हॅटट्रीकची नोंद झाली नाही.
एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान, सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढती पार पडल्या. पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश, तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारत ...
श्रीलंकेच्या नावावर या सामन्यात नकोसा विक्रम रचला गेला आहे. श्रीलंकेचे पाच फलंदाज खातंही खोलू शकले नाहीत. यासह नकोशा यादीत संयुक्तरिक्त्या दुसऱ्या स्थानावर आहेत. पहिल्या स्थानावर 6 विकेटसह झिम्बाब्वे आहे. तर न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका हे पाच विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहेत. श्रीलंकेच्या डावात नऊ खेळाडू हे एकेरी अंकी धावसंख्येवर बाद झाले आहेत. यात नुवानिदू फर्नांडो याने 15 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकलं नाही.