मुंबई: अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येनंतर 10 वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने अखेर बुधवारी अभिनेता राहुल सिंह यांची निर्दोष मुक्तता केली आहे. प्रत्युषा बॅनर्जी हिचा तत्कालीन प्रियकर असलेल्या अभिनेता-निर्माता राहुल सिंह यांच्यावर प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. राहुल सिंह यांच्याकडून झालेल्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषणामुळे प्रत्युषाने आत्महत्या केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. ऑगस्ट 2023 मध्ये दिंडोशी सत्र न्यायालयाने सिंह यांच्याकडून करण्यात आलेली आरोपातून मुक्त होण्याची विनंती फेटाळली होती. त्यानंतर राहुल यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी करताना, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या खंडपीठाने बुधवारी राहुल सिंह यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यास मंजुरी दिली आहे. (Pratyusha Banerjee Suicide Case)
1 एप्रिल 2016 रोजी प्रसिद्ध अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी यांनी गोरेगाव येथे आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांचे प्रियकर राहुल सिंह यांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या संशयातून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 2 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने राहुल सिंह यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. या घटनेच्या तपासानंतर 2 वर्षांनी म्हणजेच एप्रिल 2018 मध्ये बांगूर नगर पोलिसांनी या प्रकरणी एक आरोपपत्र दाखल केले. यानंतर अभिनेत्याने या आरोपातून मुक्त होण्यासाठी अर्ज दाखल केला होता जो 2023 मध्ये दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळला. अखेर 30 सप्टेंबर 2026 रोजी राहुल सिंह यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेली आहे.
भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. वेस्ट इंडिजने विजयासाठी 406 धावांच आव्हान ठेवलं होतं. हे लक्ष्य तसं कठीण होतं. पण कर्णधार शुभमन गिल ...
राहुल सिंह यांनी मात्र प्रत्युषाच्या पालकांवर आरोप केले आहेत. प्रत्युषाचे पालक हे नेहमी तिच्या वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करत होते तसेच आपल्या मुलीचे पैसे उधळून त्यांना ऐशोआरामात जगायचे होते, असा आरोप त्यांनी केला. प्रत्युषा ही माझ्यामुळे नाही तर तिच्या पालकांमुळे नैराश्यात गेली होती असा दावा त्यांनी केला. तर दुसरीकडे प्रत्युषाच्या आईने राहुल हा अतिनियंत्रण ठेवणारा प्रियकर होता आणि त्याने अनेक वेळा तिच्यावर हल्ला केला असून तिच्या पैशांचा गैरवापर करत तिला कंगाल केले, असे आरोप राहुलवर केले. (Pratyusha Banerjee Suicide Case)
सिंह यांचे वकील मिठारे यांनी बाजू मांडताना राहुल आणि प्रत्युषा यांच्या शेवटच्या दूरध्वनी संवादाचा दाखला दिला. यात राहुल आपल्या आईवडिलांवर नाराज असलेल्या प्रत्युषाला समजावत असून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते आणि आपले तिच्यावर किती प्रेम आहे हे समजावत होते. तसेच वकील मिठारे यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नसताना देखील राहुलच्या विरोधात दाखल झालेल्या आरोपपत्रावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले.