मतचोरीचा आरोप म्हणजे ‘मत-जिहाद’ लपविण्याचा प्रयत्न- मंत्री नितेश राणे

विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनी लोकसभा निवडणुकीनंतर निकालावर आक्षेप का घेतला नाही, असा सवाल राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केला. भाजपने मतचोरी केली असती तर लोकसभेत ४०० पार जागा मिळाल्या असत्या. अयोध्या, वरळी आणि बारामतीच्या जागा भाजपला मिळाल्या नाहीत, तसेच कर्नाटक आणि केरळमध्येही भाजपचा पराभव झाला. त्यामुळे ‘मत-जिहाद’ लपविण्यासाठी मतचोरीचा आरोप केला जात असल्याचे राणे म्हणाले.


भाजप प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री राणे बोलत होते. जंतरमंतरवरील आंदोलनाची पुनरावृत्ती मुंबईत होण्याची शक्यता आहे का, या प्रश्नावर राणे यांनी जंतरमंतरवरील आंदोलनात विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देशविरोधी शक्तींना व्यासपीठ मिळाल्याचा आरोप केला. उमर खालिदचे समर्थक, देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आणि ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देणारे लोक त्या आंदोलनात दिसल्याचे ते म्हणाले. शिवाजी महाराजांचा अपमान करणारे सध्याचे चित्र ही त्याची सुरुवात असल्याचे सांगत, उद्या टिपू सुलतानचे झेंडे फडकवले जातील किंवा औरंगजेबाची पूजा केली जाईल आणि त्यालाही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाचे स्वरूप दिले जाईल, अशी शक्यता राणे यांनी व्यक्त केली. हे आंदोलन देशविरोधी किंवा ‘जिहादी’ शक्तींसाठी व्यासपीठ ठरत आहे का, हा मूळ प्रश्न असल्याचे ते म्हणाले. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे चिंता करू नये, असेही राणे यांनी सांगितले.


विद्यार्थ्यांची लूट होत असल्याचा तसेच व्यवस्थापन कोट्यातून शिक्षकांच्या जागा भरल्या जात असल्याचा अभिजित दीपके यांचा आरोप असल्याबाबत राणे म्हणाले की, कोणत्याही व्यवस्थेत काही अडचणी किंवा मुद्दे असतील तर ते सोडविण्यास सरकार तयार आहे. सुधारणा करण्यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असून, काही सूचना किंवा अडचणी असतील तर त्या सरकारसमोर मांडाव्यात, असे त्यांनी सांगितले. एमपीएससीच्या व्यवस्थेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सुधारणा केल्या. त्याचप्रमाणे अन्य कोणत्याही व्यवस्थेत अडचणी असतील तर त्या सरकारला सांगाव्यात. लोकनियुक्त सरकार जनतेच्या अडचणी सोडवेल, असेही ते म्हणाले.


prahaar.in/2026/10/01/depicting-cockroaches-in-place-of-mavalas-is-an-insult-to-shivrai-minister-nitesh-rane-launches-a-scathing-attack/

...तर राहुल गांधी निवडून आले असते का?


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप केल्याबाबतही मंत्री राणे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, कर्नाटक आणि केरळमधील निवडणुकाही मतचोरीने झाल्या का, असा सवाल त्यांनी केला. मतचोरी झाली असती तर भाजप ४०० पार गेला असता, अयोध्येची जागा जिंकली असती. तसेच राहुल गांधी उत्तर प्रदेशातून आणि त्यांच्या भगिनी केरळमधून निवडून आल्या नसत्या, असा दावा राणे यांनी केला. स्वतः निवडणूक जिंकतात तेव्हा निवडणूक आयोगाबाबत आक्षेप घेतला जात नाही; मात्र ज्या ठिकाणी पराभव होतो, तेथे आयोगावर प्रश्न उपस्थित केले जातात, अशी टीका राणे यांनी केली. देशातील जनता हे पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.


इंडिया आघाडीच्या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा निर्णय झाल्याबाबतही राणे यांनी भाष्य केले. लोकसभा निवडणुकीनंतरच ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी होती. लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या जागा वाढल्या असताना त्यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी का केली नाही, असा सवाल त्यांनी केला. आता विविध राज्यांत पराभव होत असताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचे राणे म्हणाले.

Comments
Add Comment

महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी निमित्त विशेष नाणे अन् टपाल तिकीट होणार प्रसिद्ध , मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकाराला यश

आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत, स्त्री शिक्षणाचे प्रणेते तसेच शेतकरी व कष्टकरी बांधवांच्या

Nushrratt Bharuccha: अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बाली येथे अपघात; रुग्णालयात उपचार सुरु

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बाली येथे अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बाली येथे कामाच्या

Chandrashekhar Bawankule : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न ! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दुष्काळी परिस्थिती पाहून ट्रिगर-वनमध्ये न आलेल्या तालुक्यांचाही समावेश करणार मुंबई : दुष्काळी परिस्थितीमुळे

Satara Crime : 19 वर्षीय हर्षदा जाधव हत्या प्रकरणाचा उलगडा ! वडील आणि चुलत्याला अटक ; हत्येचे धक्कादायक कारण समोर

Satara Crime : सातारा जिल्ह्यातील शिरवळ-राजेवाडी रस्त्यालगत १४ सप्टेंबर रोजी आढळलेल्या १९ वर्षीय तरुणीच्या मृतदेहाचे

Flydubai Pilot Attack : फ्लायदुबई विमानात पायलटवर प्राणघातक हल्ला; युएईकडून दहशतवादी कोनाची शक्यता तपासण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

दुबई : दुबईहून (Dubai News)  तेल अवीवला जाणाऱ्या 'फ्लायदुबई'च्या विमानात सह-पायलटने मुख्य वैमानिकावर (पायलट-इन-कमांड)

Shalarth ID scam : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला वेग ! नाशिक विभागातील संशयित शाळांवर 11 विशेष पथकांची धडक

Shalarth ID scam : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला नाशिक शहर पोलिसांनी वेग दिला असून, नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे