Crime News : मैत्रिणीला खूश करण्याचा भयंकर नाद! मौजमजेसाठी चोरल्या 3 दुचाकी






मैत्रिणींसोबत फिरवण्यासाठी दुचाकी चोरली; 3 तरुणांना अटक


छत्रपती संभाजीनगर :  मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या 3 तरुणांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या 3 दुचाकी जप्त केल्या आहेत. संजय विनोद जाधवर, सुशांत मंगेश भालेराव आणि युवराज विष्णू चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

22 सप्टेंबर रोजी पोलिसांचे विशेष पथक पाम हॉटेल परिसरात गस्त घालत होते. यावेळी एका मोपेडवर 3 तरुण एकाच वेळी प्रवास करताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. चौकशीत त्यांनी ही मोपेड क्रांती चौक परिसरातून चोरल्याची कबुली दिली.



त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपींनी टाऊन सेंटर परिसरातून आणखी 2 दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील तिन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत.


पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकी चोरी करण्यासाठी आरोपी वेगळी चावी वापरत नव्हते. ते दुचाकीच्या हँडल लॉकवर पायाने जोरदार लाथ मारून ते तोडत होते. त्यानंतर वायर जोडून गाडी सुरू करून ते पसार होत होते.


चोरी केलेल्या दुचाकींचा वापर आरोपी मैत्रिणींना फिरवण्यासाठी आणि मौजमजेसाठी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून चोरीच्या अन्य घटनांमध्ये त्यांचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू आहे.







Comments
Add Comment

'हे काही क्रिकेट नाही...', 406 धावांचा यशस्वी पाठलाग करूनही टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नाखूश

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वनडे सामन्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने 405 धावा

Nashik : सिंहस्थापूर्वी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई ! झारखंडची टोळी जेरबंद, 3.32 लाखांचे मोबाईल जप्त

Nashik : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.

Online Gambling : ऑनलाईन जुगाराच्या व्यसनापोटी डिलिव्हरी बॉय बनला सराईत गुन्हेगार; नवी मुंबई पोलिसांकडून नऊ गुन्हे उघडकीस

नवी मुंबई : ऑनलाईन जुगाराच्या (Online Gambling) व्यसनापायी पैशांची गरज भागवण्यासाठी एका 24 वर्षीय डिलिव्हरी बॉयने

'यंदा पावसाने दगा दिला'... एकनाथ शिंदेंच्या 'त्या' ट्विटने चिंता वाढली, जनतेला भावनिक आवाहन करत म्हणाले...

महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून आता रब्बी हंगामासमोरही संकट उभं राहिलं

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''

आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानला ठेचलं, फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

गिफू : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games 2026) मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने तुफानी कामगिरी करत अंतिम फेरीत (Final) धडक मारली