दिल्ली येथे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमच्या अंमलबजावणीसाठी १,७८९.५२ कोटींच्या खर्चाला केंद्र सरकारकडून मंजुरी

दिल्ली शहर हे नेहमीच वाहनांच्या गर्दीत अडकलेलं असतं. दिल्लीला सतावणाऱ्या वाहतूक कोंडीवर आता केंद्र सरकारने उपाय शोधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्लीमध्ये इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) च्या अंमलबजावणीसाठी १,७८९.५२ कोटींच्या खर्चाला बुधवारी मंजुरी दिली आहे.

दिल्ली: दिल्ली शहर हे नेहमीच वाहनांच्या गर्दीत अडकलेलं असतं. दिल्लीला सतावणाऱ्या वाहतूक कोंडीवर आता केंद्र सरकारने उपाय शोधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्लीमध्ये इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) च्या अंमलबजावणीसाठी १,७८९.५२ कोटींच्या खर्चाला बुधवारी मंजुरी दिली आहे.


कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हा उपक्रम वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी अनुकूल वाहतूक सिग्नल म्हणजेच ॲडॅप्टिव्ह ट्रॅफिक सिग्नल्स सादर करेल. तंत्रज्ञानावर आधारित अंमलबजावणी यंत्रणा अधिक मजबूत करेल आणि प्रवाशांना रिअल- टाइम वाहतूक माहिती प्रदान करेल. हा प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये ४२ प्रमुख वाहतूक मार्गांना (ट्रॅफिक कॉरिडॉर्स) व्यापेल आणि रुग्णवाहिकांना प्राधान्याने वाहतूक करण्यास सक्षम करेल. तसेच वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अपघातांना जलद प्रतिसाद सुनिश्चित करेल. पहिल्या टप्प्यात, पहिल्या १२ महिन्यांत ५ वाहतूक मार्गांवर २५० सिग्नल जंक्शन आणि २७१ अंमलबजावणी केंद्रांसह ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येईल. तर दुसरा टप्पा १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असून त्यात ७ वाहतूक मार्ग, २२२ सिग्नलयुक्त जंक्शन आणि २३६ अंमलबजावणी केंद्रांची भर पडेल.






हा परिवर्तनकारी उपक्रम राष्ट्रीय राजधानीसाठी एक सुरक्षित, अधिक स्मार्ट आणि अधिक कार्यक्षम शहरी गतिशीलता परिसंस्था तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच ही यंत्रणा वाहतूक सिग्नलना रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहनांसाठी आपोआप ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यास सक्षम करेल. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आपत्कालीन वाहनांमध्ये सेन्सर्स बसवले जातील जे जंक्शनजवळ पोहोचताना वाहतूक सिग्नलशी कनेक्ट होतील. एकदा सिग्नलने आपत्कालीन वाहन जवळ येत असल्याचे ओळखले की सिग्नल आपोआप हिरवा होईल आणि ते वाहन पुढे जाईपर्यंत तो सिग्नल तसाच राहील. यातील अंतर मर्यादा किती असेल हे स्पष्ट होणे बाकी आहे. परंतु, या एआय आधारित प्रणालीचा फायदा आपत्कालीन वाहनांना मोठ्या प्रमाणात होणार आहे हे नक्की.

Comments
Add Comment

Tata Motors best selling car : टाटाच्या या छोट्या कारने मार्केट हलवले! १० महिन्यांत ७० हजार ग्राहक झाले फिदा; पहा कोणती आहे ही गाडी ?

आजच्या काळात प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याकडे स्वतःची एक कार असावी. विशेषतः बजेट कमी असेल, तर लहान आणि

TejRan Wedding News: करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लवकरच अडकणार लग्नबंधनात? 'देसी ब्लिंग 2'मध्ये सात फेरे घेणार असल्याची चर्चा!

[caption id="attachment_1075841" align="alignnone" width="800"] टीव्ही विश्वातील लोकप्रिय जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे आवडत्या जोडप्यांपैकी

Admiral Krishna Swaminathan statement : "युद्धजन्य सागरी क्षेत्रातून भारतीय जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आम्ही खंबीर!"- नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन

नवी दिल्ली : जगभरात सागरी तणाव वाढत असताना, होर्मुझ सामुद्रधुनीजवळ (Strait of Hormuz) भारतीय नौदलाने आपल्या युद्धनौका का

Bharat Scouts and Guides: देवेंद्र फडणवीस यांची 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'भारत स्काउट्स अँड गाईड्स'च्या १३ व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी

PM Modi Barong Tagalog : पंतप्रधान मोदींचा फिलिपिन्सच्या 'बॅरोंग टॅगालॉग' पोशाखात रॉयल लूक; 'गाला डिनर'मध्ये वेधले जागतिक नेत्यांचे लक्ष!

अनिवासी भारतीयांना आपुलकीची विचारपूस! मनिला : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या तीन दिवसांच्या फिलिपिन्स

Tiger Shroff comeback : गोळीबाराच्या धक्क्यातून सावरत टायगर श्रॉफचे सोशल मीडियावर दणक्यात पुनरागमन; चाहत्यांना दिले जबरदस्त सरप्राईज!

गेल्या महिनाभरापासून बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा त्याच्यावर झालेल्या गोळीबाराच्या दुर्दैवी घटनेमुळे