Thursday, October 1, 2026

Tukaram Mundhe: 'आधी स्वतःच्या मुलांना खायला द्या' पान मसाल्यांची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांवर तुकाराम मुंढेंचा संताप

Tukaram Mundhe: 'आधी स्वतःच्या मुलांना खायला द्या' पान मसाल्यांची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांवर तुकाराम मुंढेंचा संताप
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रभर कारवायांचा धडाका लावला आहे. दूधभेसळ, उपहारगृहात अस्वच्छता, अन्नपदार्थांमध्ये भेसळ याविरोधात कारवाया सुरु असताना मुंढेंनी आपला मोर्चा गुटखा आणि पान मसाल्यांची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांकडे वळवला आहे. काही दिवसांपूर्वी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्याविरोधात विमल पान मसाल्याच्या जाहिरातीत ब्रँड प्रचारक म्हणून सहभागी झाल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी झालेल्या मुलाखतीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. (Tukaram Mundhe) गुटखा आणि पान मसाला यांसारख्या शरीराला घातक असलेल्या उत्पादनांचे समर्थन आणि जाहिरात करणाऱ्या खरमरीत भाषेत आव्हान केले आहे. या उत्पादनांच्या जाहिराती करताना जे निकष लावता ते त्यांनी स्वतःसाठी तसेच आपल्या कुटुंबासाठी देखील लावावेत, अशा कठोर शब्दांत त्यांनी टिप्पणी केली आहे. मुलाखतीत पुढे मुंढे म्हणाले, 'जर अभिनेता या उत्पादनांची जाहिरात करत असेल तर त्यांनी देखील त्याचे सेवन करावे आणि स्वतःच्या मुलांना देखील ते खायला लावा आणि सवय लावा. नंतर ते इतरांना करायला सांगा.' अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.
तसेच एखाद्या वस्तूची जाहिरात करणं म्हणजे फक्त त्या जाहिरातीसाठी आपला चेहरा देणं असं होत नाही. त्या व्यक्तीची ती जबाबदारी असते की लोकांना काय करण्यास सांगावे किंवा सांगू नये. ज्या व्यक्ती किंवा सेलिब्रिटी एखाद्या उत्पादनाचे समर्थन करणाऱ्या जाहिराती करतात, त्या उत्पादनांशी निगडित जबाबदारीपासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवू शकत नाहीत, विशेषतः जेव्हा ती उत्पादने अन्न-सुरक्षा आणि जाहिरात कायद्यांनुसार प्रश्न निर्माण करतात. लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वेगळे निकष आणि व्यावसायिक कामात वेगळे मापदंड असे वागू शकत नाहीत. जर तुम्ही लोकांना एखादी गोष्ट करण्यास सांगता तर ती तुमची देखील जबाबदारी आहे. ही फक्त निर्मात्याची जबाबदारी नसून जाहिरात करणाऱ्या अभिनेत्याची देखील जबाबदारी असल्याचे मुंढे म्हणाले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >