Flydubai Pilot Attack : फ्लायदुबई विमानात पायलटवर प्राणघातक हल्ला; युएईकडून दहशतवादी कोनाची शक्यता तपासण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

दुबई : दुबईहून (Dubai News)  तेल अवीवला जाणाऱ्या 'फ्लायदुबई'च्या विमानात सह-पायलटने मुख्य वैमानिकावर (पायलट-इन-कमांड) चाकूने प्राणघातक हल्ला करून विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या गंभीर घटनेची नोंद घेत संयुक्त अरब अमिरातीने (युएई) या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, यामागे कोणताही दहशतवादी कट किंवा पूर्व नियोजित कट होता का, या कोनातूनही तपास केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 'फ्लायदुबई'चे FZ1073 हे विमान १७४ प्रवाशांना घेऊन जात असताना ही भयानक घटना घडली. उड्डाणादरम्यान अचानक सह-पायलटने मुख्य वैमानिकावर चाकूने वार केले, ज्यामुळे विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते सुमारे १६,००० फूट खाली कोसळले. मात्र, विमानात उपस्थित असलेले भारतीय pilot स्मित मच्छार (Smit Machchhar) यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडल्याने प्रवाशांनी तातडीने सह-पायलटला पकडून बांधून ठेवले. त्यानंतर विमानात उपस्थित असलेल्या दुसऱ्या पायलटच्या जोडीने नियंत्रण मिळवून हे विमान सौदी अरेबियातील ताबुक (Tabuk) विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले आणि १७४ जणांचे प्राण वाचले.


या संपूर्ण प्रकरणावर 'युएई'च्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. या घटनेची पार्श्वभूमी आणि नेमकी कारणे शोधण्यासाठी अटॉर्नी-जनरल कौन्सिलर डॉ. हमद अल शम्सी यांनी सरकारी वकिलांच्या तज्ज्ञ सदस्यांची एक विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान युएईमध्ये नोंदणीकृत असून त्यावर युएईचा ध्वज आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, देशाच्या हद्दीबाहेर जरी अशी घटना घडली असली, तरी या गुन्ह्याचा तपास करण्याचा आणि कायदेशीर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार युएई प्रशासनालाच आहे.


या तपासादरम्यान सह-पायलटचा मुख्य हेतू काय होता, यामागे काही पूर्वयोजना होती का, तसेच या घटनेचा थेट संबंध कोणत्याही दहशतवादी संघटनेशी किंवा हालचालींशी आहे का, या सर्व बाबींची सखोल चौकशी केली जाणार आहे. या कठीण प्रसंगात सहकार्य आणि योग्य समन्वय दाखवल्याबद्दल युएईने सौदी अरेबियाच्या प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत. तसेच, तपास पूर्ण होऊन अधिकृत माहिती समोर येत नाही तोपर्यंत नागरिकांनी आणि माध्यमांनी कोणत्याही अफवांवर किंवा बिनबुडाच्या माहितीवर विश्वास ठेवू नये आणि ती पसरवू नये, असे आवाहनही युएई परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.



विमान क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आश्चर्य


दुसरीकडे, विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी या प्रसंगाबाबत प्रचंड आश्चर्य व्यक्त केले आहे. 'Flightradar24' च्या माहितीनुसार, अवघ्या २९ सेकंदात हे विमान १४,१२५ फूट खाली आले होते. एवढ्या प्रचंड वेगाने खाली येत असताना हवेच्या दाबामुळे विमानाचे मागचे सुकाणू (Rudder) तुटून वेगळे झाले होते. अशा स्थितीतही हे विमान हवेतच दोन तुकडे न होता किंवा क्रॅश न होता सावरले, ही एक चमत्कारिक घटना असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाचे (NTSB) माजी तपासनीस आणि विमान सुरक्षेचे तज्ज्ञ जेफ गुझेटी यांनी सांगितले की, जर हे विमान १०,००० फुटांपेक्षा जास्त खाली आले असते तर ते सावरणे जवळजवळ अशक्य होते. वैमानिकांनी योग्य वेळी दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे आणि शिल्लक असलेल्या उंचीमुळेच प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

Comments
Add Comment

MRPL Blast Mangaluru : मंगळुरूमधील MRPL प्लांटमध्ये भीषण स्फोट ! एकाचा मृत्यू, 9 जण जखमी

MRPL Blast Mangaluru : कर्नाटकातील मंगळुरू येथील जोकाट्टे परिसरातील मंगळुरू रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL)

Captain Smit Machchhar : भारतीय पायलट स्मित मछार ठरले 'रिअल हिरो'; ट्रम्प व नेतान्याहू यांनी केले कौतुक

पंतप्रधान मोदींकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानात हवेतच घडलेल्या धक्कादायक

बीएसएनएल 27 वा स्थापना दिन साजरा करणार; दूरसंचार क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळाची यशस्वी वाटचाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून महत्त्वपूर्ण चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी

Rabi MSP 2026 : रब्बी पिकांच्या MSP मध्ये मोठी वाढ; केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला अधिक लाभदायक भाव मिळावा आणि रब्बी हंगामातील पिकांच्या

Anamika Mishra: वय अवघं 7 वर्ष; लक्ष्य 30 किलोमीटर! अनामिकाच्या धाडसी आव्हानाची चर्चा

नवी दिल्ली: 'मुर्ती लहान पण किर्ती महान' ही म्हण आपण ऐकली असेल. या म्हणीचा प्रत्यय सहसा आपल्याला लवकर येत नाही. पण या