Mumbai Rewas Ferry : मुंबई-रेवस बोटसेवा आजपासून पुन्हा सुरू; प्रवाशांना मोठा दिलासा, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई : मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबागच्या रेवसदरम्यान बंद असलेली प्रवासी बोटसेवा 1 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यात समुद्रातील परिस्थिती आणि बदलत्या हवामानामुळे ही सेवा काही महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आली होती. आता समुद्र आणि हवामान प्रवासी वाहतुकीसाठी अनुकूल झाल्याने जलमार्ग पुन्हा खुला करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबईहून अलिबाग आणि कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.  (Mumbai Rewas Ferry)



प्रवासी वाहतुक पुन्हा सुरु


दरवर्षी पावसाळ्याच्या काळात भाऊचा धक्का-रेवस मार्गावरील सेवा थांबवण्यात येते. याच काळात मोरा-भाऊचा धक्का आणि गेटवे ऑफ इंडिया-मांडवा या मार्गांवरील बोटसेवा आधीच टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली होती. मात्र, भाऊचा धक्का ते रेवस मार्गावर हवामानामुळे अधिक काळ खबरदारी घेण्यात आली. आता परिस्थिती सुधारल्यानंतर या मार्गावर पुन्हा प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. (Bhaucha Dhakka)



जाणून घ्या वेळापत्रक


मुंबई-रेवस बोट प्रवासासाठी प्रवाशांना 100 रुपये तिकीट द्यावे लागणार आहे. भाऊचा धक्का येथून पहिली बोट सकाळी 6.30 वाजता सुटणार आहे. त्यानंतर सकाळी 8, 10, दुपारी 12, 4 आणि 5 वाजता बोटी उपलब्ध असतील. मात्र, समुद्रातील परिस्थिती आणि हवामानानुसार वेळापत्रकात बदल होऊ शकतो, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Rewas Boat Service)


मुंबई-रेवस जलवाहतूक पुन्हा सुरू झाल्यामुळे रस्ते मार्गावरील प्रवाशांचा काही प्रमाणात वेळ वाचण्यास मदत होणार आहे. तसेच उरणमधील करंजा-रेवस जलमार्गावर येणारा अतिरिक्त प्रवासी भारही कमी होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात अलिबाग, रायगड आणि कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बोटसेवा विशेष महत्त्वाची ठरणार आहे. (Ferry service)


Comments
Add Comment

Powai Lake: पवई तलावांत जाणारे सांडपाणी १०० टक्के बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पवई तलावात मिसळणाऱ मलजलाच्या २० प्रवाहांना ‘इंटरसेप्ट’ करून ते भांडुप मलजल प्रक्रिया

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमास मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल २ लाख ५९ हजारांहून अधिक भाविक, नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमयी वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी

Ganesh Idols Immersion: कृत्रिम तलावांमध्ये तब्बल 97 टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन, मुंबई महानगरपालिकेचा दावा

मुुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईकर श्रीगणेशभक्त आणि श्रीगणेश मंडळांनी उदंड प्रतिसाद देत तब्बल 97.27 टक्के

BMC News : मुंबईत ७० वर्षांवरील ज्येष्ठांना आयुष्यमान वय वंदना कार्ड; एमडीसी अभियानाचा २ ऑक्टोबरपासून शुभारंभ,महापालिकेच्यावतीने १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट (एमडीसी) अभियान १०० दिवसांच्या कालावधीसाठी राबविण्यात

Mumbai News: बोरिवलीत अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई, अतिक्रमण विभागाने 20 बांधकामे आणि 15 स्टॉल्स केले निष्कासित

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाची काटेकोर अंमलबजावणी

BMC : मागील २८ दिवसांमध्ये अस्वच्छता करणाऱ्यांकडून १८.७० लाखांचा दंड वसूल; तब्बल १,३३६ प्रकरणांमध्ये महापालिकेने केली दंडात्मक कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने १ ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन उपविधी, २०२५