दृश्यम चित्रपटात नवा ट्वीस्ट, आता 2 ऑक्टोबर नाही तर 23 जुलै! सोशल मीडियावर तारखेचा नवा ट्रेंड

भारतीय चित्रपट इतिहासात थरारक सिनेमा म्हणून दृश्यमची ख्याती आहे. मल्याळम चित्रपटाच्या कथानकावर बॉलिवूडमध्ये दृष्यम चित्रपट तयार केला. बॉलिवूड कलाकार अजय देवगण याने या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका बजावली. त्याने या पात्राला योग्य न्याय दिला आणि विजय साळगावकर म्हणून चित्रपट चाहत्यांच्या घरात मन करून गेला. या चित्रपटातील तब्बूची मीरा ही भूमिकाही गाजली. त्यामुळे या चित्रपटाचा पुढचा भाग काय असेल? याबाबत कायम उत्सुकता राहिली. आतापर्यंत या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले आणि चाहत्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. आता तिसरा भागही प्रदर्शित झाला आहे. 'दृश्यम द कन्क्लुजन'अर्थात 'दृश्यम 3', एका नव्या कथानकासह आणि थक्क करणाऱ्या ट्विस्टसह हा चित्रपट परत आला आहे. या चित्रपटाच्या पार्ट 2 मध्ये विजय साळगावकर आणि कुटुंबियांवरील संकट टळल्याचं दिसलं. त्यामुळे या भागात काय ट्विस्ट असेल याबाबच चर्चा रंगली आहे. दृश्यम पार्ट 3 मध्ये एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे अजय देवगण साकारत असलेल्या विजय साळगावकरचं कुटुंब पुन्हा अडचणीत आलं आहे. त्यामुळे पोलिसांसोबतचा लपंडाव पुन्हा सुरू झाला आहे.


दृश्यम चित्रपटाच्या दोन भागांमध्ये 2 ऑक्टोबर ही तारीख गाजली. कारण या तारखेच्या अवतीभवती कथानक फिरत होतं. सर्व काही 2 ऑक्टोबरला घडलं असंच दाखवलं गेलं. त्यावरून बरेच मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि होत आहेत. पण आता 2 ऑक्टोबरनंतर 23 जुलै या तारखेचा ट्विस्ट या चित्रपटात आला आहे. कारण दृश्यम 3 चित्रपटाचं पूर्ण कथानक या तारखेवरच अडकलं आहे. कारण या दिवशी विजय साळगावकर या पात्राने सॅमच्या सांगाड्याचे अवशेष फॉरेंसिक लॅबमधून काढून दुसऱ्या बॉडीचे अवशेष टाकले होते. दृष्यम 2 मध्ये हा ट्विस्ट होता. त्यामुळे विजय आणि त्याच्या कुटुंबियांना कोर्टाने क्लिन चीट दिली होती.



23 जुलैच्या रात्री विजय साळगावकर सॅमच्या अवशेषांसोबत जे काही केलं होतं. त्या अवशेषाचा एक तुकडा एसपी राजवीर तोमरच्या हाती लागला आहे. या जोरावर मीरा आणि तिचा पती महेश हे साळगावकरवर राग काढण्याचा निर्णय घेतात. त्याच्या रात्रीच्या पुराव्यामुळे विजय आणि त्याचं कुटुंबिय पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर येतं. पण आता यातून विजय साळगावरचं कुटुंब वाचतं का? आतापर्यंत रचलेल्या गोष्टीत अपयश येतं? हे सर्व तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल.

Comments
Add Comment

Prithvik Pratap: कौतुकास्पद! पृथ्विक प्रतापचं काम ऐकून तुम्हीही कौतुक कराल, जिल्हा परिषद शाळेसाठी घेतलाय खास उपक्रम

ठाणे: कायमच आपल्या दमदार अभिनयामुळे चाहत्यांमध्ये अभिनेता पृथ्विक प्रताप चर्चेत राहतो. महाराष्ट्राची

Aadi Anant Movie: "आदि अनंत" चित्रपटाची घोषणा, संकर्षण कऱ्हाडेची खास पोस्ट; म्हणाला, "सगळ्यांनी आयुष्यात अनुभवलेल्या नात्यावर..."

मुंबई: अभिनेता आणि कवी संकर्षण कऱ्हाडेचा लवकरच चाहत्यांच्या भेटीला नवाकोरा चित्रपट येत आहे. महेश लिमये

Drishyam The Conclusion X Review : 'दृश्यम: द कन्क्लुजन' ला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद; अजय देवगणच्या चित्रपटाचा सोशल मीडियावर डंका!

मुंबई : वर्षभरातील सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला 'दृश्यम: द कन्क्लुजन' (Drishyam The Conclusion ) अखेर

Nushrratt Bharuccha Accident Update: अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बाली येथे अपघात, शस्त्रक्रियेची गरज; अधिकृत माहिती समोर

अभिनेत्री नुसरत भरुचा ही कामानिमित्त परदेशात असताना तिचा अपघात झाला. बाली येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु

Dharavu Marathi Movie : धाराऊ... ती गाय नाय... माय हाय! दिग्दर्शक मनिष शिंदेचा “धाराऊ” चित्रपट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

मोशन पोस्टरनंतर सोशल मीडियावर उत्सुकता* मुंबई : “धाराऊ... ती गाय नाय... माय हाय!” या लक्षवेधी

October Movie Releases 2026 : ॲक्शन, हॉरर, कॉमेडी आणि रोमँटिक ड्रामाचा तडका ! ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये दृश्यम 3 सह 'या' 12 सिनेमांचा धमाका

October Movie Releases : ऑक्टोबर महिना सुरू झाला असून सिनेप्रेमींसाठी हा महिना मनोरंजनाची मोठी पर्वणी घेऊन आला आहे.