Mahabharat fame Actor Ayush Shah: भरघोस परताव्याचं आमिष अन् 4.44 कोटींचा गंडा! अभिनेता आयुष शाह फसवणुकीचा बळी

'महाभारत', 'नव्या' आणि 'उत्तराण' यांसारख्या टीव्ही मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आयुष शाह याची मोठी फसवणूक झाली आहे. सिनेसृष्टीतून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयुष शाह याची तब्बल 4,44,48,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून अभिनेत्याची ही आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

Mahabharat fame Actor Ayush Shah: 'महाभारत', 'नव्या' आणि 'उत्तराण' यांसारख्या टीव्ही मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आयुष शाह याची मोठी फसवणूक झाली आहे. सिनेसृष्टीतून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयुष शाह याची तब्बल 4,44,48,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून अभिनेत्याची ही आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.


गुंतवणुकीवर भरघोस परतावा देऊ असे आमिष दाखवून आयुषची 4.44  कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मुंबईस्थित एका व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेच्या संचालकांविरुद्ध आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी तातडीने तपास करुन एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.






नेमकं प्रकरण काय?


अभिनेता आयुष शाहला फ्लेज इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटीसह विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. जर तुम्ही गुंतवणूक केली तर खात्रीशीर आणि चांगला परतावा देखील देऊ, असे आश्वासनही अभिनेत्याला देण्यात आले होते. परंतु, आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी आयुष शाह याचा विश्वास मिळवण्यासाठी फिर्यादीला बनावट बँक स्टेटमेंट देखील पाठवले होते, अशी माहिती आहे.


तसेच शाह यांनी पोलिसांना, आरोपींनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून त्यांना विमान वाहतूक आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगांशी संबंधित असलेल्या त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले, असे सांगितले. फसवणूक, बनावटगिरी, विश्वासघात आणि गुन्हेगारी कट यांसारख्या भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये कंपनीचे तीन संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांसह एकूण पाच जणांची नावे आहेत.


आपली फसवणूक झाली असल्याचं समजताच अभिनेत्याने थेट ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि पोलिसांना फसवणूक झाली असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणी बिश्वजित बादलचंद्र घोष, पियाली चॅटर्जी, बिज्योया दास, शाबाब हुसैन आणि बादलचंद्र घोष यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 318(2), 318(4), 336(2), 336(3), 340(2), 61(1) आणि 3(5) अंतर्गत पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली आहे. या प्रकरणी आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Samantha Prabhu : समंथा रुथ प्रभूच्या घरी बाळाच्या स्वागतासाठी पूजा; नवव्या महिन्यातील खास फोटो व्हायरल!

समंथा रुथ प्रभू आणि तिचे पती राज निदिमोरू आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. या जोडप्याने

Rasika Vengurlekar New Home: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रसिका वेंगुर्लेकरचं घराचं स्वप्न पूर्ण; नव्या घराचा गृहप्रवेश!

Rasika Vengurlekar New Home: मुंबईत आपलं स्वतःच हक्काचं घर असावं अस प्रत्येकाचं स्वप्न असत. त्यासाठी सगळेचजण दिवसरात्र मेहनत घेत

Tu Aahes Naa: सुप्रिया पिळगावकर पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘तू आहेस ना’चा इफ्फीमध्ये वर्ल्ड प्रीमियर!

'देवमाणूस' च्या यशानंतर लव फिल्म्सने आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘तू आहेस ना’ या नव्या

अखेर प्रतीक्षा संपली! 'पंचायत 5' ची रिलीज डेट जाहीर; फुलेरा गावात पुन्हा रंगणार राजकारण आणि कल्ला!

मुंबई: ओटीटीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेली आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये

Maan Marathi Movie: आशुतोष गोवारीकरांची पहिली मराठी निर्मिती 'मान'; 4 जून 2027 रोजी चित्रपट रिलीज

Maan Marathi Movie: काही दृश्यं शब्दांपेक्षाही अधिक प्रभावीपणे एखाद्या कथेची चाहूल देतात. भेगाळलेली जमीन, त्या जमिनीवरून

Madhavi Nimkar viral video: कोकणच्या मातीशी जोडली नाळ! अभिनेत्री माधवी निमकर गावाकडच्या परंपरेत रमली; हाताने जमीन सारवतानाचा व्हिडीओ चर्चेत

आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनात गावाकडच्या साध्या-सुध्या गोष्टींचा आनंद काही वेगळाच असतो. मातीचा सुगंध,