Rasika Vengurlekar New Home: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रसिका वेंगुर्लेकरचं घराचं स्वप्न पूर्ण; नव्या घराचा गृहप्रवेश!

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन तिने यासंदर्भात माहिती दिली आहे. या व्हिडीओतून तिने गृहप्रवेशाची झलक शेअर केली आहे. सध्या अभिनेत्रीच्या व्हिडीओची तिच्या चाहत्यांमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. सिनेकलाकार तसेच मित्रमंडळींनी कमेंट करुन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Rasika Vengurlekar New Home: मुंबईत आपलं स्वतःच हक्काचं घर असावं अस प्रत्येकाचं स्वप्न असत. त्यासाठी सगळेचजण दिवसरात्र मेहनत घेत असतात. मग त्यात सामान्य माणूस असो किंवा कलाकार. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi hasyajatra) फेम मराठी अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर (Rasika Vengurlekar) कॉमेडी शोमधून घराघरात पोहोचली. तिने आपल्या कारकि‍र्दीत मालिकांमध्येही काम केलं आहे. नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिका तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल माहिती देत असते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. सध्या तिच्या चर्चेत असण्यामागचं कारण तिने हक्काचं स्वत:चं घर घेतलं आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन तिने यासंदर्भात माहिती दिली आहे. या व्हिडीओतून तिने गृहप्रवेशाची झलक शेअर केली आहे. सध्या अभिनेत्रीच्या व्हिडीओची तिच्या चाहत्यांमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. सिनेकलाकार तसेच मित्रमंडळींनी कमेंट करुन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.






रसिका वेंगुर्लेकरनं घेतलं स्वत:चं हक्काचं घर


रसिका वेंगुर्लेकर हिची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमधून ओळख निर्माण झाली. तिने या शोमधून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आणि प्रेक्षकांच्या मनात स्थानं निर्माण केलं. पण सध्या नव्या घरामुळे रसिका वेंगुर्लेकरची विशेष चर्चा होत आहे. अभिनेत्रीचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. अभिनेत्रीने गृहप्रवेशाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने पारंपारिक पद्धतीने पूजा केली आहे, असे दिसत आहे.





या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने आपल्या पतीसोबतचे काही फोटोस व्हिडीओमध्ये टाकले आहेत. यात घराचा मुख्य दरवाजा, बाल्कनी दिसत आहे. तिने सुरुवातीला घराची पूजा केली. नंतर घराच्या चावीसोबत काही फोटोज शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये रसिकाचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत लक्षवेधी कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'A New Home, New Dreams, and a Beautiful New Beginning. This Diwali brought so much more happiness into our lives. Feeling blessed and Grateful '. तिने आपल्या भावना कॅप्शनमधील शब्दांतून व्यक्त केलं आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर नेटकरी तसेच सिनेकलाकारांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सिनेकलाकार तसेच मित्र मंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments
Add Comment

Tu Aahes Naa: सुप्रिया पिळगावकर पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘तू आहेस ना’चा इफ्फीमध्ये वर्ल्ड प्रीमियर!

'देवमाणूस' च्या यशानंतर लव फिल्म्सने आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘तू आहेस ना’ या नव्या

अखेर प्रतीक्षा संपली! 'पंचायत 5' ची रिलीज डेट जाहीर; फुलेरा गावात पुन्हा रंगणार राजकारण आणि कल्ला!

मुंबई: ओटीटीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेली आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये

Maan Marathi Movie: आशुतोष गोवारीकरांची पहिली मराठी निर्मिती 'मान'; 4 जून 2027 रोजी चित्रपट रिलीज

Maan Marathi Movie: काही दृश्यं शब्दांपेक्षाही अधिक प्रभावीपणे एखाद्या कथेची चाहूल देतात. भेगाळलेली जमीन, त्या जमिनीवरून

Madhavi Nimkar viral video: कोकणच्या मातीशी जोडली नाळ! अभिनेत्री माधवी निमकर गावाकडच्या परंपरेत रमली; हाताने जमीन सारवतानाचा व्हिडीओ चर्चेत

आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनात गावाकडच्या साध्या-सुध्या गोष्टींचा आनंद काही वेगळाच असतो. मातीचा सुगंध,

मराठी चित्रपटाला हवी प्रभावी 'ब्रँडिंग'ची जोड! 'चित्रपताका' महोत्सवात दिग्गजांचा मोलाचा सल्ला

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम कथा आणि प्रतिभावान कलाकारांची कमतरता नाही; परंतु त्यांना योग्य प्रसिद्धी आणि

CallMeBae2 OTT Release: अनन्या पांडेच्या ‘Call Me Bae 2’ची रिलीज डेट जाहीर! डिसेंबरमध्ये ओटीटीवर रंगणार नवा धमाका

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आली आहे. अनन्या पांडेच्या लोकप्रिय वेब