‘सीजेपी’च्या आंदोलनाआडून उमर खालिद, शरजील इमामला ‘हिरो’ बनविण्याचा प्रयत्न; मंत्री नितेश राणेंनी उपस्थित केला सवाल

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) वतीने मुंबईत आंदोलन सुरू असतानाच, या आंदोलनातील काही फलकांवरून मंत्री नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आंदोलनात सहभागी एका महिलेच्या हातातील फलकावर ‘फ्री उमर खालिद’, ‘फ्री शरजील इमाम’, तसेच ‘फ्री अवर पॉलिटिकल प्रिझनर्स’ आणि ‘फ्री अवर इंटेलेक्ट, फ्री अवर स्कॉलर्स’ अशा घोषणा लिहिल्याचे दिसत आहे. हा फोटो राणे यांनी सोशल मीडियावर शेअर करत ‘उघडा डोळे, बघा नीट!’ असे आवाहन केले आहे.





दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीकडून (सीजेपी) शिवाजी पार्क येथे आंदोलन सुरू असताना या आंदोलनाच्या विरोधात ‘जेन नेक्स्ट’ रस्त्यावर उतरले. मंत्रालय परिसरात जेन नेक्स्टकडून आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मुंबईत एकाच वेळी सीजेपीच्या समर्थनार्थ आणि त्याच्या विरोधात अशी दोन आंदोलने सुरू झाल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले.(Nitesh Rane)



देशभरातील एसआयआर प्रक्रियेवरून विरोधी पक्षांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील सीजेपीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि २०२९ची निवडणूक २०२५च्या मतदारयादीच्या आधारे घ्यावी, अशा मागण्याही पक्षाकडून करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी शिवाजी पार्क येथे सीजेपीचे आंदोलन सुरू असताना त्याला विरोध करण्यासाठी जेन नेक्स्ट मंत्रालय परिसरात जमले. “सिजेपी राजकारण करत आहे. आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. मात्र अभिजीत दीपके आणि त्यांचे सहकारी संविधान मानत नाहीत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत,” अशी भूमिका जेन नेक्स्टच्या आंदोलकांनी मांडली.

Comments
Add Comment

एसआयआरविरोधातील आंदोलनाला घटनात्मक आधार नाही - मंत्री आशिष शेलार

मुंबई : मतदार यादीच्या विशेष सखोल पडताळणीची (एसआयआर) प्रक्रिया निवडणूक आयोगाने निश्चित कार्यपद्धतीनुसार जाहीर

Sunil Tatkare : 'एसआयआर'साठी राष्ट्रवादीची फौज मैदानात, २८८ विधानसभा मतदारसंघांत समन्वयकांची नियुक्ती; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती

मुंबई : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्रिक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील

डिनो मोरियाचा आका ‘कलानगरात’ - मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; ‘नाईट लाईफ गँग’चा उल्लेख करत आदित्य ठाकरेंवरही निशाणा

मुंबई : मिठी नदी गैरव्यवहारप्रकरणी अभिनेता डिनो मोरियावर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्याचे

मतचोरीचा आरोप म्हणजे ‘मत-जिहाद’ लपविण्याचा प्रयत्न- मंत्री नितेश राणे

विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनी लोकसभा निवडणुकीनंतर निकालावर आक्षेप का

Nitesh Rane : मावळ्यांच्या जागी 'कॉकरोच' दाखवणे हा शिवरायांचा अपमान ! मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल

अभिजित दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माफी मागावी मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''