मुंबई: पश्चिम रेल्वेला आता आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहे. उद्यापासून अर्थात 3 ऑक्टोबरपासून सुरत ते उदयपूर या स्थानकादरम्यान ही नवीन वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. 530 किलोमीटर अंतर असलेल्या ह्या प्रवासासाठी वंदे भारत एक्स्प्रेसने तब्बल 7 तास 30 मिनिटांचा अवधी लागणार आहे. गुजरात आणि राजस्थान अशा दोन राज्यांमध्ये ही एक्स्प्रेस धावणार आहे. या एक्स्प्रेसमुळे प्रवाशांच्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणावर वेळेची बचत होणार आहे. स्वदेशी बनावटीची असलेल्या ह्या एक्स्प्रेसला प्रवाशांना दमदार प्रतिसाद मिळत आहे. सुसाट धावणाऱ्या ह्या एक्स्प्रेसच्या माध्यमातून प्रवाशांना रेल्वेकडून प्रिमियम सेवा पुरवल्या जात आहेत.
नवी दिल्ली : फ्लायदुबईच्या विमानात कॉकपिटमध्येच झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून वाचलेले भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार (captain Smit Machhar) यांच्या पत्नी ...
देशांच्या वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ही वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. प्रवाशांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता रेल्वे बोर्डाकडून आणखीन वंदे भारत एक्स्प्रेसच्या संख्येमध्ये वाढ केली आहे. पश्चिम रेल्वेने आता सुरत- उदयपूर मार्गावर नवी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून अर्थात 3 ऑक्टोबरपासून डाऊन- 26903 आणि अप- 26904 सुरत- उदयपुर सिटी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. ही हाय- स्पीड ट्रेन नवरात्रीचे औचित्य साधून प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरत- उदयपूर वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस चालवली जाणार आहे. मंगळवार वगळता दररोज ही एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेमध्ये असणार आहे. 4 ऑक्टोबरपासून या एक्स्प्रेसची नियमित सेवा प्रवाशांना मिळणार आहे.
🚆 New Vande Bharat Express: Surat–Udaipur Western Railway introduces Train No. 26903/26904 Surat–Udaipur-Surat Vande Bharat Express, operating 6 days a week (except Tuesday) Ex Surat from 04 October 2026. Inaugural run Ex Surat on 02/10/26 as train no. 09103. 📍 Major Halts:…
— DRM - Mumbai Central, WR (@drmbct) September 29, 2026
26903 सुरत- उदयपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरत स्थानकावरून दररोज सकाळी 6.10 मिनिटांनी सुटेल आणि उदयपूर सिटी स्थानकावर दुपारी 1.40 मिनिटांनी पोहोचेल. त्यानंतर 26904 उदयपूर सिटी- सुरत वंदे भारत एक्स्प्रेस उदयपूर सिटी स्थानकावरून दुपारी 3.35 मिनिटांनी सुटेल. सुरत स्थानकावर ही एक्स्प्रेस रात्री उशिरा 11 वाजता पोहोचवेल. सुरत ते उदयपूर सिटी दरम्यान 530 किलोमीटरचा प्रवास आहे. वंदे भारत एक्स्प्रेसने तुम्ही 7 तास 30 मिनिटांमध्ये पोहोचू शकणार आहेत. पश्चिम रेल्वेकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, वंदे भारत एक्स्प्रेस नवीन ट्रेन दोन टप्प्यांत चालवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात, 2 ऑक्टोबर 2026 रोजी सुरत रेल्वे स्थानकावरून या ट्रेनचे उद्घाटन करण्यात येणार आहे. जिथे ती ट्रेन क्रमांक 09103 या क्रमांकाने आपला पहिला विशेष प्रवास करेल. 4 ऑक्टोबर 2026 पासून या वंदे भारत एक्स्प्रेसची नियमित प्रवासी सेवा सुरू होईल.
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्ध संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या शांततेच्या प्रयत्नांची ...
26903 डाऊन आणि 26904 अप सुरत- उदयपूर वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस चालवली जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. सुरत-उदयपूर सिटी वंदे भारत ट्रेनमुळे गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांदरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखीन सुधारेल. याचा केवळ प्रवाशांनाच फायदा होणार नाही, तर व्यवसाय आणि पर्यटनाच्या उद्देशानेही ही शहरे जोडली जातील. ही ट्रेन अनेक महत्त्वाच्या शहरांदरम्यान चालवली जाणार आहे. सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, मणीनगर, असरवा, हिंम्मतनगर, शामलजी रोड, डुंगरपुर, जावर आणि उदयपूर सिटी अशा प्रमुख 11 शहरांमधून हाय स्पीड वंदे भारत एक्स्प्रेस चालवली जाणार आहे. 8 कोच असणारी ही वंदे भारत एक्स्प्रेस पर्यटकांसाठी आणि बिझनेसमन लोकांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी चेअर कार (CC) क्लाससाठी प्रवाशांना ₹1460 भाडं निश्चित करण्यात आलं आहे. तर, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ₹ 2760 प्रवाशांना इतकं भाडं भरावे लागणार आहे. या भाड्यामुळे प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.




