डिनो मोरियाचा आका ‘कलानगरात’ - मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; ‘नाईट लाईफ गँग’चा उल्लेख करत आदित्य ठाकरेंवरही निशाणा

मुंबई : मिठी नदी गैरव्यवहारप्रकरणी अभिनेता डिनो मोरियावर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. डिनो मोरिया हा महाविकास आघाडीच्या काळातील ‘नाईट लाईफ गँग’चा सदस्य असून, त्याचा आका ‘कलानगरात’ राहतो. त्याच्या माध्यमातून कंत्राटांबाबतच्या बाबी ठरवल्या जात असल्याचा दावा राणे यांनी केला. या प्रकरणामागे राजकीय वरदहस्त कोणाचा होता, हे टप्प्याटप्प्याने समोर येईल, असेही ते म्हणाले.

“महाविकास आघाडीच्या काळात डिनो मोरियाच्या घरी बसून कोणाला किती कंत्राट मिळणार, याबाबत सगळे ठरवायचे. तिथे स्वतः आदित्य ठाकरे असायचे,” असा आरोप राणे यांनी केला. त्यामुळे डिनो मोरिया हा एकमेव आरोपी नसून, त्याला कंत्राटे मिळवून देण्यासाठी कोणाची मदत होती आणि तो कोणाच्या वतीने हे सर्व करत होता, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईला लुटण्याचे आणि लुबाडण्याचे काम ज्यांनी केले, त्या सर्वांना आता कारवाईला सामोरे जावे लागेल. ही तर फक्त सुरुवात आहे. आता पुढे टप्प्याटप्प्याने काय होते ते पाहा, असेही ते म्हणाले.



 

सुया आदित्य ठाकरेंकडे जात आहेत!

 

डिनो मोरियाला कंत्राटे स्वतःच्या ताकदीवर किंवा ओळखीच्या जोरावर मिळत होती का, असा सवाल उपस्थित करत मंत्री राणे यांनी या प्रकरणातील राजकीय संबंधांकडे लक्ष वेधले. डिनो मोरियाचे काही नेत्यांसोबतचे संबंध आणि त्याचे फोटो यांचा उल्लेख करत त्यांनी या प्रकरणातील “सुया आदित्य ठाकरेंकडे जात आहेत”, असा दावा केला. “डिनो मोरियाची एवढी ताकद नाही की तो स्वतः हे सगळे कंत्राट मिळवू शकतो. त्याला कोणीतरी मदत करत आहे,” असे राणे म्हणाले. त्याला मदत करणाऱ्या ‘नाईट लाईफ गँग’मधील लोकांचीही टप्प्याटप्प्याने चौकशी आणि वस्तुस्थिती समोर येईल, असा दावा त्यांनी केला.
Comments
Add Comment

India vs Pakistan Head to Head: भारताचा सलग सहा सामन्यात विजय, पाकिस्तानला अनेक वर्षांची प्रतीक्षा

एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. एका वर्षाच्या कालावधीत हा

Asian Games 2026 : धीरज आणि कुमकुमने रचला इतिहास; मिश्रित रिकर्व्ह तिरंदाजीत भारताला प्रथमच रौप्यपदक!

नागोया (जपान) : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई खेळ 2026 मध्ये भारताच्या तिरंदाजांनी उत्कृष्ट

Pilot Meals : पायलट्सना एकच जेवण का दिलं जात नाही ? विमान सुरक्षेशी संबंधित आहे 'हे' महत्त्वाचं कारण

Pilot Meals : तुम्हांला माहिती आहे का विमानातील कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर नेहमी एकच जेवण करत नाहीत. आणि हा केवळ आवडीनिवडीचा

Crime News : समृद्धी महामार्गावर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, हत्या करून मृतदेह फेकल्याचा संशय

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील गुन्हेगारी आणि अपघातांच्या घटनांमध्ये पुन्हा एका गंभीर घटनेची भर

Modi Putin : युक्रेन युद्ध संपवण्यासाठी मोदींचे प्रयत्न; पुतिन म्हणाले, “मोदींच्या कल्पना प्रभावी!”

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्ध संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aadi Anant Movie: "आदि अनंत" चित्रपटाची घोषणा, संकर्षण कऱ्हाडेची खास पोस्ट; म्हणाला, "सगळ्यांनी आयुष्यात अनुभवलेल्या नात्यावर..."

मुंबई: अभिनेता आणि कवी संकर्षण कऱ्हाडेचा लवकरच चाहत्यांच्या भेटीला नवाकोरा चित्रपट येत आहे. महेश लिमये