अमरावती : नवरात्रोत्सवासाठी दुर्गामूर्ती आणण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. धामणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात 7 तरुणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वर्धा जिल्ह्यातील सिंदी मेघे परिसरातील नवदुर्गा पूजा उत्सव समितीचे सदस्य दरवर्षीप्रमाणे यंदाही शेगाव येथून दुर्गामातेची मूर्ती आणण्यासाठी गेले होते. मूर्ती घेऊन बोलेरो पिकअप वाहनातून ते समृद्धी महामार्गाने वर्ध्याच्या दिशेने परतत होते. धामणगावजवळ त्यांच्या वाहनाला कंटेनरने मागून जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे.
धडकेनंतर मूर्ती असलेल्या वाहनातील काही तरुण महामार्गावर पडले. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. जखमींना सुरुवातीला धामणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमींना वर्ध्यातील सावंगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
#WATCH | Amravati, Maharashtra: Seven killed, around 19 injured in a road accident on Samruddhi Mahamarg in Amravati. The victims were travelling in a pickup vehicle carrying an idol of Goddess Durga, according to preliminary information. Visuals from the spot
(Source: Amravati… pic.twitter.com/tq4AD1xMbo
— ANI (@ANI) October 2, 2026
दुष्काळी परिस्थिती पाहून ट्रिगर-वनमध्ये न आलेल्या तालुक्यांचाही समावेश करणार मुंबई : दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना ...
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. समृद्धी महामार्गावरील चॅनल 97 जवळ ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या दुर्घटनेत घनश्याम पाटील, ओम गावंडे, सचिन बादमनवार, प्रवीण बकाने, दत्ता कुळसंगे यांच्यासह अन्य 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नवरात्रोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे सिंदी मेघे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.