भारतीय संघाचा वरचष्मा
एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावण्यासाठी मैदानात उतरणार आहे.आता सुवर्ण पदक कोणत्या खात्यात जाणार हे सामना संपल्यानंतरच कळेल, पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाची आकडेवारी जबरदस्त आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 17 टी20 सामने खेळले गेले आहेत. त्यात भारताने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानच्या खात्यात तीन विजय गेले आहेत. पण 2022 पासून पाकिस्तानची स्थिती नाजूक आहे. पाकिस्तानने तेव्हापासून आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. या दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहा सामने झाले आणि सहाही भारताने जिंकले. यापीकी तीन सामने तर मागच्या वर्षी आशिया कप आणि एक सामना यावर्षी झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये झाला.
भारत आणि पाकिस्तान हे संघ मल्टीनेशन स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकतात. त्यामुळे हे संघ आमनेसामने असले की क्रीडाप्रेमींसाठी एक उत्सव असतो. कारण भारत आणि ...
पाकिस्तानने कधी जिंकला सामना?
पाकिस्तानने आतापर्यंत भारताविरुद्ध तीन टी20 सामन्यात विजय मिळवला आहे. यात दोन विजय तर 12 महिन्यांच्यात आतच पाकिस्तानला मिळाले होते. पहिला टी20 वर्ल्डकप 2021 मध्ये पाकिस्तानने भारताला साखळी फेरीत पराभूत केलं होतं. त्यानंतर 2022 च्या आशिया कप स्पर्धेच्या सुपर 6 फेरीत पाकिस्तानने विजय मिळवला होता. तर पाकिस्तानचा तिसरा विजय हा 2012 मध्ये आला होता. भारत दौऱ्यावर असताना एकमेव विजय मिळाला होता. तर भारताने टी20 वर्ल्डकप 2007 आणि आशिया कप 2026 स्पर्धेत भारताने पाकिस्तानला नमवलं आहे.