Asian Games 2026 : जागतिक तिरंदाजीत भारताचा डंका! दक्षिण कोरियाचा पराभव करत रिकर्व तिरंदाजी संघाने जिंकले सुवर्णपदक

भारतीय महिला रिकर्व तिरंदाजी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत प्रथमच सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात भारतीय संघाने विद्यमान विश्वविजेत्या दक्षिण कोरियाचा 5-3 असा पराभव केला. अंकिता भक्त, कीर्ती शर्मा आणि कुमकुम महोदय यांचा भारतीय संघ या सामन्यात मैदानात उतरला होता.


सामना सुरुवातीपासूनच चुरशीचा झाला. वेगवान वाऱ्यामुळे तिरंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्या दोन सेटमध्ये दोन्ही संघांची बरोबरी झाली. दोन्ही सेटमध्ये भारत आणि दक्षिण कोरियाने अनुक्रमे 54 आणि 56 गुण मिळवत प्रत्येकी एक सेट पॉइंट मिळवला.


तिसऱ्या सेटमध्ये मात्र दक्षिण कोरियाच्या खेळाडूंची कामगिरी खालावली. कोरियन संघाने सलग तीन वेळा 8 गुण मिळवल्याने त्यांची एकूण गुणसंख्या 52 राहिली. याचा फायदा घेत भारतीय तिरंदाजांनी 55 गुण मिळवत हा सेट आपल्या नावावर केला.



चौथ्या सेटमध्ये दक्षिण कोरियाने 54 गुण मिळवले. भारताकडून कीर्तीने सुरुवातीला 8 गुण मिळवले. त्यानंतर हा स्कोअर 9 करण्यात आला. भारताची एकूण गुणसंख्या 54 झाली आणि चौथा सेट बरोबरीत सुटला. त्यामुळे भारताने 5-3 अशी आघाडी कायम ठेवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.





यापूर्वी भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत चीनचा 5-1 असा पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश केला होता. 2023 मध्ये हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कंपाउंड संघाने कांस्यपदक जिंकले होते.


भारतीय तिरंदाजीचे प्रशिक्षक लोकेश चंद यांनी या विजयाचे महत्त्व सांगताना दक्षिण कोरियाच्या संघाचा अनुभव आणि कामगिरीचा उल्लेख केला. दक्षिण कोरिया हा 10 वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन राहिला असून 1978 नंतर अंतिम सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला नव्हता. अशा अनुभवी संघाविरुद्ध युवा भारतीय खेळाडूंनी मिळवलेला विजय विशेष ठरला.


Comments
Add Comment

Sindhudurg News : सिंधुदुर्गातील 7 ठिकाणी चक्रीवादळाची रंगीत तालीम; आपत्ती यंत्रणांची तयारी तपासली

सिंधुदुर्ग : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन

Dhamangaon Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दुर्गामूर्ती आणताना 7 तरुणांचा मृत्यू, 12 जण जखमी

अमरावती : नवरात्रोत्सवासाठी दुर्गामूर्ती आणण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर भीषण

Diveagar Accident : दिवेआगर दुर्घटनेची सखोल चौकशी होणार; दोषींवर कडक कारवाईचे निर्देश

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे.

Maharashtra Investment Summit : राज्याच्या विकासाला मोठी गती! इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8.57 लाख कोटींचे सामंजस्य करार

महाराष्ट्रात 8.57 लाख कोटींची गुंतवणूक; 2.91 लाख रोजगारांच्या संधी मुंबई : महाराष्ट्राला देशासह जागतिक स्तरावर

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात 8.5 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव; 3 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी

मुंबई : महाराष्ट्राला देशासह जागतिक स्तरावर गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनवण्याच्या उद्देशाने ‘इन्व्हेस्ट

Pakistan Water Crisis : सिंधू जल करार स्थगितीनंतर पाकिस्तानात गंभीर जलसंकट; आंतरराष्ट्रीय मंचावर मदतीसाठी भारतासमोर विनवणी!

इस्लामाबा