भारत आणि पाकिस्तान हे संघ मल्टीनेशन स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकतात. त्यामुळे हे संघ आमनेसामने असले की क्रीडाप्रेमींसाठी एक उत्सव असतो. कारण भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत आणि हा सामना म्हणजे युद्धासारखंच वातावरण असतं. पण गेल्या काही वर्षात पाकिस्तान भारतीय संघाच्या आसपासही नाही. त्यामुळे हायव्होल्टेज सामना असला तरी भारताचा वरचष्मा दिसून आला आहे. आयसीसीने नुकतंच वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. तसेच गट फेरीत दोन्ही संघ 10 ऑक्टोबर 2027 ला भिडणार आहे. त्यामुळे हा एकच सामना असेल असं अनेकांना वाटत आहे. पण तसं नाही. हे संघ एकदा नाही तर दोन तीन वेळा भिडण्याची शक्यता आहे. यात अंतिम फेरीचा समावेशही आहे. चला कसं काय ते समजून घेऊयात.
सुपर 7 फेरीचं गणित काय?
आयसीसीने वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर केलं असून 12 संघाचे सहा सहाचे दोन गट केले आहेत. यातील दहा संघ आधीच ठरले आहेत. तर दोन संघ पात्रता फेरीतून निश्चित होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान अ गटात असून या गटात ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे हे संघ आहेत. तर एक संघ पात्रता फेरीतून या गटात सहभागी होईल. या गटात प्रत्येक संघ एकदा भिडेल. पण भारत पाकिस्तान सामना सुपर 7 फेरीतही होण्याची शक्यता आहे. कारण या फेरीत स्थान मिळवल्यानंतर राउंड रॉबिन पद्धतीने सामना होईल. आणि भारत पाकिस्तान हे संघ सुपर 7 फेरीत नक्कीच पोहोचतील असं दिसत आहे.
आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. गेल्या काही दिवसांपाासून या स्पर्धेच्या वेळापत्रकाची चर्चा होती. अखेर आयसीसीने या स्पर्धेचं ...
गट फेरीतील 12 पैकी 7 संघ सुपर 7 फेरीत स्थान पक्कं करतील. यात दोन्ही गटातून प्रत्येकी 3-3 संघ असतील. तर सातवा संघ गुणांकनाच्या आधारावर ठरवला जाईल. त्यामुळे पाकिस्तानची सुपर 7 मधील एन्ट्री निश्चित मानली जात आहे. आयसीसीचं वेळापत्रक पाहता, सुपर 7 फेरीत भारत पाकिस्तान सामना 7 नोव्हेंबरला केपटाउनध्ये होण्याची शक्यता आहे. ही तारीख निश्चित असण्याचं कारण म्हणजे आयसीसीने भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानला आधीच A1, A2 आणि A3 असं मानांकन दिलं आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याही स्थानी राहिलं आणि पात्र ठरलं तर सामन्याच्या तारखा तशाच असतील.
भारत पाकिस्तान सामना उपांत्य फेरीत
सुपर 7 फेरीतून टॉप 4 संघ उपांत्य फेरीत लढणार आहेत. यात पहिल्या क्रमांकावरील संघ चौथ्या क्रमांकाशी, दुसऱ्या क्रमांकाचा संघ तिसऱ्या क्रमांकाशी लढणार आहे. जर भात आणि पाकिस्तान दोन्ही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले तर या ठिकाणी लढत होऊ शकते. पण यासाठी क्रम तसा असायला हवा. जर दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत विजय मिळवला तर 21 नोव्हेंबरला अंतिम फेरीत नक्कीच आमनेसामने येतील. त्यामुळे या स्पर्धेत एकापेक्षा अधिक सामने होण्याची शक्यता आहे.





