Thursday, October 1, 2026

'हे काही क्रिकेट नाही...', 406 धावांचा यशस्वी पाठलाग करूनही टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नाखूश

'हे काही क्रिकेट नाही...', 406 धावांचा यशस्वी पाठलाग करूनही टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नाखूश
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वनडे सामन्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने 405 धावा केल्या आणि 406 धावांचं लक्ष्य टीम इंडियासमोर ठेवलं. खरं तर हे लक्ष्य खूपच कठीण होतं. पण टीम इंडियाने हे कठीण वाटणारं लक्ष्य फक्त 2 विकेट गमवून पूर्ण केलं. त्यामुळे या सामन्याची चर्चा होत आहे. या सामन्यात दोन्ही सघांनी मिळून 800हून अधिक धावा केल्या. तसेच चार फलंदाजांनी शतक आणि कर्णधार शुभमन गिलने द्विशतक ठोकलं. वनडे क्रिकेट इतिहासात दुसऱ्यांदा 400 पार धावा गाठण्याचा विक्रम प्रस्थापित झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीचं कौतुक होत आहे. मात्र टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मात्र या विजयावर नाखूश आहे. त्याला कारणही तसंच आहे. गुवाहाटीतील खेळपट्टीवर गोलंदाजांना जराही मदत झाली नाही. सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, 'खरं सांगायचं तर बॅट आणि बॉलमध्ये सामना व्हायला पाहीजे. पण हे काही क्रिकेट नाही, ही फक्त फलंदाजी आहे.'

काय म्हणाला गौतम गंभीर?

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला की, 'तुम्ही जरा विचार करा की, एक नवा गोलंदाज या विकेटवर गोलंदाजी करत आहे. समोरचा संघ 400 धावा करते आणि आम्ही त्या धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करतो. हे एक मोठा विक्रम आहे. क्रिकेटप्रेमी आणि ब्रॉडकास्टरसाठी हे चांगलं आहे. पण माझ्यासारख्या खऱ्या क्रिकेटप्रेमीला हे काही रुचणारं नाही. एक प्रशिक्षक म्हणून मी गोलंदाजांप्रती सहानुभूती ठेवेले. या खेळपट्टीवर गोलंदाजी करणं काही योग्य नाही. गोलंदाजांना मदत होऊ शकेल असं काही करायला हवं.'
गौतम गंभीरने पुढे सांगितलं की, 'तु्म्ही प्रत्येक वेळी गोलंदाजांसाठी असं कठोर वागू शकत नाही. कारण कारण कधीकधी आकडेवारी खराब असली तरी ती त्यांच्या खराब गोलंदाजीचे प्रतिबिंब नसते. तो फक्त योग्य ठिकाणी गोलंदाजी करू शकतो. दोन नवीन चेंडू, ३० यार्डांच्या आत पाच क्षेत्ररक्षक आणि आजकाल होणारी जोरदार फलंदाजी पाहता, गोलंदाजांकडे फारसे पर्याय उरत नाहीत.' आकिब नबीचं उदाहरण देत गौतम गंभीरने सांगितलं की, 'तो त्याचा पहिला सामना खेळत होता. त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे. कारण या सामन्यात गोलंदाजासाठी खूप काही नव्हतंच.' आकिब नबीने पदार्पणाच्या सामन्यात 8.5 षटकं टाकली आणि 84 धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्याने 9.50 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >