Drowning Incident : अमरावतीत दुर्दैवी घटना; रत्नापूर तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

अमरावती: रायगड येथील दुर्घटनेची बातमी ताजी असतानाच अमरावतीमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. शहरात फिरायला आलेल्या दोन तरुणांचा रत्नापूर तलावामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळच्या सुमारास काही तरुण मातोश्री वृद्धाश्रम परिसरातील रत्नापूर तलावाच्या परिसरात फिरण्यासाठी आले होते. यादरम्यान काही जण पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले. उपस्थित स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.



या दुर्घटनेत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले असून, तलावाच्या परिसरातून शोधकार्य सुरू आहे. रायगडपाठोपाठ घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा पर्यटन आणि जलस्रोतांच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane News: महाराष्ट्राच्या 877 किमी किनारपट्टीचा एकात्मिक विकास साधणार, मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मुंबई: महाराष्ट्राची ८७७ किलोमीटर लांबीची किनारपट्टी, बंदरांचे विस्तृत जाळे आणि मजबूत औद्योगिक व उत्पादन

'भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र'ला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पोस्ट

मुंबई: मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद बातमी आहे. अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसाच्या पुर्वसंध्येला केंद्र

शेगावहून देवीची मूर्ती घेऊन जाताना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ शुक्रवारी पहाटे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा

FDA ने CIPLA फार्मा कंपनीला दिला दणका, गोदामातील औषध विक्री परवानेच केले रद्द

पुणे: अन्न- औषध प्रशासनाने औषधांची सुरक्षितता, गुणवत्ता, योग्य साठवणूक तसेच औषध विक्री आणि वितरणातील वैधानिक

दिवेआगारातील त्या घटनेनंतर आळंदीतील विनर्स अकादमीला फटका, परवाना केला रद्द; कारण की....

११ वी आणि १२ वी इयत्तेत शिकत असलेल्या८ अल्पवयीन मुलांचा दिवेआगर येथे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आळंदी

Mahendra Harpalkar : ‘एमपीएससी’चे सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चेनंतर फडणवीस सरकारची कार्यवाही

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या