मुंबई: महाराष्ट्राची ८७७ किलोमीटर लांबीची किनारपट्टी, बंदरांचे विस्तृत जाळे आणि मजबूत औद्योगिक व उत्पादन क्षेत्र ही राज्याची मोठी सागरी ताकद असून, या क्षमतेचा एकात्मिक विकास करण्यावर राज्य सरकारचा भर आहे, असे मत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. रस्ते आणि रेल्वे यांच्याशी बंदरांची जोडणी, जलवाहतूक आणि शहरी वाहतुकीचे एकत्रीकरण, तसेच सागरी पायाभूत सुविधांना औद्योगिक विकासाची जोड देण्याचे राज्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (एससीआय) ६५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राणे बोलत होते. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, गुंतवणूकदार, सागरी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मुंबई: मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद बातमी आहे. अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसाच्या पुर्वसंध्येला केंद्र सरकारने पुण्यामध्ये 'अभिजात मराठी भाषा ...
वाढवण बंदरासह जलवाहतुकीला गती देण्यावर सर्वाधिक भर
भारताच्या सागरी क्षेत्रासाठी सध्या परिवर्तनाचा टप्पा सुरू असून, विकसित भारत २०४७च्या उद्दिष्टपूर्तीसाठी सक्षम, लवचिक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सागरी क्षेत्र आवश्यक आहे. बंदरे, नौवहन, जहाजबांधणी, लॉजिस्टिक्स, किनारी वाहतूक आणि सागरी सेवा या सर्वांचा एकात्मिक विकास करण्याची गरज आहे, असे राणे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या सागरी क्षमतेचा विकास एकात्मिक पद्धतीने करण्यासाठी वाढवण बंदर, किनारी आणि प्रवासी जलवाहतुकीचा विस्तार, तसेच जहाजबांधणी आणि जहाज दुरुस्तीच्या सुविधांचा विकास या प्रकल्पांवर भर दिला जात आहे. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राची बंदरे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी अधिक सक्षमपणे जोडली जातील, असे राणे यांनी नमूद केले. राज्यात देशांतर्गत सागरी पायाभूत सुविधांचे मजबूत जाळे उभारण्यासाठी ‘महाराष्ट्र जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण २०२५’ लागू करण्यात आले आहे. या माध्यमातून राज्यात जहाजबांधणी आणि दुरुस्ती क्षेत्रासाठी आवश्यक परिसंस्था विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ शुक्रवारी पहाटे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 18 जण जखमी झाले ...
हरित तंत्रज्ञानावर भर
जागतिक सागरी क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. नवीन तंत्रज्ञान, पर्यायी इंधन, डिजिटलायझेशन, स्वयंचलित यंत्रणा आणि पर्यावरणपूरक जहाजे यामुळे नौवहन क्षेत्राचे स्वरूप बदलत आहे. या बदलांसाठी भारताने सज्ज राहण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, जहाजमालक, बंदरे, जहाजबांधणी केंद्रे, तंत्रज्ञान कंपन्या, वित्तीय संस्था आणि सागरी उद्योग यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे राणे यांनी सांगितले. सागरी क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच कुशल मनुष्यबळ विकसित करणेही महत्त्वाचे आहे. कुशल खलाशी, अभियंते, बंदर क्षेत्रातील व्यावसायिक, जहाजबांधणी तज्ज्ञ, लॉजिस्टिक्स क्षेत्रातील मनुष्यबळ आणि नव्या पिढीतील सागरी उद्योजक यांच्यामुळे या क्षेत्राचा विस्तार होईल, असे त्यांनी नमूद केले.




