दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘डीपीसी’चा निधी गोठवला; रस्ते, पायाभूत सुविधांच्या कामांना ब्रेक

जलसंधारण, टँकर आणि चारा छावण्यांसाठी निधी वळवणार

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समित्यांचा (डीपीसी) निधी पूर्णपणे गोठविण्यात आला असून, या निधीतून होणाऱ्या सिमेंट रस्त्यांसह अन्य विकासकामांना ब्रेक देण्यात आला आहे. गावातील पाणी गावातच अडवून जिरविण्यासाठी जलसंधारणाची कामे, तसेच टँकर आणि चारा छावण्यांसाठी हा निधी वापरण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिली.


प्रत्येक जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता आणि परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे स्थानिक गरजेनुसार पावसाचे पाणी अडविणे आणि ते जमिनीत जिरविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांकडे वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे डीपीसीतून होणारी सिमेंट रस्त्यांची कामे आता केली जाणार नाहीत. तसेच दलित आणि आदिवासी वस्त्यांमधील रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठीही या निधीतून खर्च करता येणार नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.






डीपीसीच्या निधीचा वापर जलसंधारणाच्या कामांसोबतच पाणीपुरवठ्यासाठी टँकर आणि जनावरांसाठी चारा छावण्यांवर करण्यात येणार आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत विकासकामांपेक्षा पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेला प्राधान्य देण्याची सरकारची भूमिका आहे. यापूर्वीही दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजन निधीचा जास्तीत जास्त वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान, सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयांमध्ये नेमक्या कोणत्या त्रुटी आहेत, त्या विरोधकांनी निदर्शनास आणून द्याव्यात. त्यांच्या विधायक सूचना स्वीकारून त्यावर काम करण्याची सरकारची तयारी आहे, असे बावनकुळे म्हणाले. दुष्काळाच्या परिस्थितीवर राजकारण न करता उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


शरद पवारांच्या सूचनांचाही विचार
पंचायत समित्यांपासून संसदेपर्यंतचे लोकप्रतिनिधी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरे करीत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार हेही काही भागांतील पीकस्थितीची पाहणी करीत असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. शासनाने घेतलेल्या निर्णयांमध्ये पवार यांनी काही सुधारणा किंवा सूचना सुचवल्यास त्यांचाही निश्चितपणे विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Comments
Add Comment

Pavana Dam: पवना धरणग्रस्तांना संपादित क्षेत्राइतकी पर्यायी जमीन; कमाल मर्यादा 4 एकर

Pavana Dam: गेल्या सहा दशकांपासून प्रलंबित असलेल्या पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळी तालुक्यांत अनावश्यक बांधकामांना स्थगिती

मुंबई : राज्यातील ३१० दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पायलटने उड्डाण रोखले

सोलापुर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान त्यांच्या

कार्तिकी वारीसाठी 5 कोटींचा निधी! चंद्रभागेच्या घाटावर उतरले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वतः हातात पाइप घेऊन केली स्वच्छता

पंढरपूर : कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय; 350 बॉडी कॅमेऱ्यांची करडी नजर, आता चुकूनही नियम मोडू नका

पुणे : वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक

Sanjay Pandey : माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून पुनामिया यांची याचिका फेटाळली

मुंबई : माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले दोन एफआयआर रद्द करण्याच्या मुंबई