Nashik : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्षपदी गणेश गीते यांची नियुक्ती

Nashik : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील राजकीय संघर्षाला अखेर विराम देत राज्याच्या पणन विभागाने संचालक मंडळ बरखास्त केले आहे. बाजार समितीच्या कारभारासाठी प्रशासकीय मंडळाची स्थापना करण्यात आली असून, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक गणेश गीते यांची प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे पणन संचालक संजय कदम यांनी १ ऑक्टोबर रोजी याबाबतचे आदेश जारी केले.


नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांपासून संचालक मंडळातील राजकीय वाद सातत्याने चिघळत होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार तथा माजी सभापती देविदास पिंगळे आणि विद्यमान सभापती शिवाजी चुंबळे यांच्या गटांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू होती. काही महिन्यांपूर्वी शिवाजी चुंबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी देविदास पिंगळे यांना सभापतिपदावरून हटविले होते. त्यानंतर बाजार समितीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला होता. दोन्ही गटांकडून सुरू असलेल्या कुरघोडींमुळे बाजार समितीचा कारभार सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.



या पार्श्वभूमीवर राज्याच्या पणन विभागाने हस्तक्षेप करीत कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६३ मधील कलम १५-अ अन्वये संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रशासकीय मंडळाची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्षपदी गणेश गीते यांच्यासह माजी आमदार बाळासाहेब सानप, सचिन भास्कर ढिकले आणि बापू पिंगळे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील आदेश होईपर्यंत हे प्रशासकीय मंडळ बाजार समितीचा कारभार पाहणार आहे. या निर्णयामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या पिंगळे विरुद्ध चुंबळे गटांतील संघर्षाला तूर्तास विराम मिळाला असून, बाजार समितीच्या कारभाराची सूत्रे आता प्रशासकीय मंडळाकडे आली आहेत.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन करणार नाही; माजी आमदार विजय गिरकर यांचा ''सीजेपी''ला इशारा

जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 साली देशाला मतदानाचा अधिकार दिल्याच्या खोट्या कंड्या सीजेपीचे

Nitesh Rane News: मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यात आदित्य ठाकरेंची चौकशी करा, शिवसेनेची मागणी

मुंबई: मिठी नदी गाळ उपशात झालेल्या ६५ कोटींच्या घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरिया याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक

बॉक्स ऑफिस हादरले! अजय देवगणच्या 'दृश्यम 3' ची तुफान कमाई, पहिल्याच दिवशी मोडले सर्व जुने विक्रम

अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दृश्यम 3: द कन्क्लुजन'  2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर

Nashik : नाशिकमध्ये ५७ हजार कोटींची गुंतवणूक ! ८ प्रकल्पांतून २४ हजार रोजगारनिर्मितीची क्षमता निर्माण होणार

Nashik : महाराष्ट्र शासनाच्या ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

IND vs WI, 3rd ODI: रोहित शर्माचं वेस्ट इंडिजविरुद्ध शतक हुकलं, पण नोंदवला असा विक्रम

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने प्रथम

Mumbai Local: नोकरदारांसाठी गुड न्यूज! मुंबई लोकलच्या ताफ्यात नवीन वर्षात 20 एसी लोकल; तब्बल 280 फेऱ्या वाढणार

मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नोकरदारांचा प्रवास आता आणखीन गारेगार होणार आहे. मुंबई लोकलच्या