IND vs WI 3rd ODI: बाबर आझमचा जागतिक विक्रम मोडण्याची शुभमन गिलची सुवर्णसंधी हुकली, झालं असं की..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात भारताची सुरूवात निराशाजनक झाली. शुभमन गिल आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाले. तर शुभमन गिल एक मोठा विक्रम रचण्यापासून दूर राहिला.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 2-0 ने आधीच जिंकली आहे. त्यामुळे तिसरा वनडे सामना हा औपचारिक आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने प्रथम फलंदाजी करणं स्वीकारलं. कारण मागच्या दोन सामन्यात प्रथम गोलंदाजी वाटेला आली होती. मात्र यावेळी शुभमन गिलने प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं. शुभमन गिल नाणेफेक जिंकल्यानंतर स्पष्ट म्हणाला की, 'आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी खूप सुंदर आहे, मला वाटतं की फलंदाजीसाठी ही एक खूप चांगली खेळपट्टी असेल. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांसाठी चेंडू थोडा स्विंग होईल.' भारताला तिसऱ्या षटकात त्याचा परिणाम दिसून आला. शुभमन गिल आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाले. इतकंच काय शुभमन गिलची विक्रमाची सुवर्णसंधी हुकली.

तीन वनडे सामन्यात सर्वाधिक धावांची संधी हुकली


कर्णधार शुभमन गिल याला एक मोठा जागतिक विक्रम आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी होती. पण ही संधी अवघ्या थोडक्यासाठी हुकली. तीन सामन्यांच्या द्विपक्षीय वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा पाकिस्तानच्या बाबर आझमचा विक्रम मोडण्यापासून गिल अवघ्या काही धावांनी दूर राहिला. या सामन्यात गिल फक्त 1 धाव करून बाद झाला आणि त्यामुळे या मालिकेत 334 धावांवरच समाधान मानावे लागले. शुभमन गिलने पहिल्या सामन्यात 110 धावा फटकावल्या होत्या. दुसऱ्या वनडे सामन्यात ऐतिहासिक आणि नाबाद 223 धावांची खेळी केली होती. बाबर आझमचा 360 धावांचा रेकॉर्ड मोडून इतिहास रचण्यासाठी फक्त 28 धावांची गरज होती.






शुभमन गिलने यापूर्वी 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत तीन सामन्यांत 360 धावा ठोकून बाबर आझमच्या (360 धावा विरुद्ध वेस्ट इंडिज, 2016) जागतिक विक्रमाशी बरोबरी केली होती. शुभमन गिलकडून आजच्या सामन्यातही मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तो केवळ 1 धाव काढून बाद झाला. परिणामी, एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी जाण्याऐवजी ३३४ धावांसह सातव्या स्थानावर स्थिरावला.

द्विपक्षीय वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज



  • 360 धावा – बाबर आझम (विरुद्ध वेस्ट इंडिज, 2016)

  • 360 धावा – शुभमन गिल (विरुद्ध न्यूझीलंड, 2023)

  • 352 धावा – डॅरिल मिचेल (विरुद्ध भारत, 2026)

  • 349 धावा – इमरुल कायेस (विरुद्ध झिम्बाब्वे, 2018)

  • 346 धावा – पथुम निसांका (विरुद्ध अफगाणिस्तान, 2024)

  • 342 धावा – क्विंटन डी कॉक (विरुद्ध भारत, 2013)

  • 334 धावा – शुभमन गिल (विरुद्ध वेस्ट इंडिज, 2026)


बाबर आझमने 2016 मध्ये 355 चेंडूचा सामना करून 360 धावा केल्या होत्या. तर शुभमन गिलने 223 मध्ये 270 चेंडूत 360 धावा केल्या होत्या. पण तरीही या यादीत बाबर आझम टॉपला आहे. आयसीसीच्या अधिकृत सांख्यिकी संस्थांच्या नियमांनुसार, जेव्हा दोन खेळाडूंच्या धावा समान असतात, तेव्हा ज्या खेळाडूने तो पराक्रम कालानुक्रमे आधी केला आहे, त्याला यादीत वरचे स्थान दिले जाते. बाबरने हा मैलाचा दगड 2016 मध्ये आधी गाठला होता, तर गिलने 2023 मध्ये त्याची बरोबरी केली होती.
Comments
Add Comment

भारताने न्यूझीलंडला 3-2 ने पराभवाची धूळ चारली, शताब्दी हॉकी मालिकेत टीम इंडियाची विजयी सलामी

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांमधील ऐतिहासिक क्रीडा संबंधांना 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने

कॅमरन बेनक्रॉफ्टच्या आरोपानंतर पॅट कमिन्स घरातून बाहेर पडणं झालं कठीण! पत्रकारांकडून प्रश्नांचा भडीमार

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 2018 मध्ये कसोटी मालिका पार पडली होती. या मालिकेतील एका सामन्यात

न्यूझीलंडला धक्का! दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला 9 गडी राखून नमवलं, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा उलटफेर

दक्षिण अफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला 9

रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेला आजपासून सुरूवात, जाणून भारताचा सामना कधी आणि पूर्ण शेड्यूल

रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. वनडे फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होत असून एकूण 8 संघ

IND vs NZ 1st Test: पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला बसवण्याचा निर्णय योग्यच! प्रशिक्षकांनी दिलं असं कारण

भारत आणि न्यूझीलंड कसोटी सामन्यातील पहिल्या सत्रात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पकड मिळवली. पण त्यानंतर ही पकड

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत बुमराहचा ऐतिहासिक पराक्रम; माजी दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथचा विक्रम मोडीत!

[caption id="attachment_1076800" align="aligncenter" width="800"] भारत न्यूझीलंड कसोटी मालिकेतून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा मैदानात