Saturday, October 3, 2026

IND vs WI 3rd ODI: रोहित शर्माला विश्रांती, यशस्वी-गिल सलामीला; वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात मोठे बदल!

IND vs WI 3rd ODI: रोहित शर्माला विश्रांती, यशस्वी-गिल सलामीला; वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात मोठे बदल!

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना न्यू चंदीगड येथे खेळवला जात आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत आधीच मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. मालिका खिशात असल्यामुळे या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघ काही प्रयोग करत बेंचवर बसलेल्या राखीव खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत आहे.

रोहित शर्माला विश्रांतीची शक्यता

माहितीनुसार, या तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या अनुपस्थितीत युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्लेइंग-11 मध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कर्णधार शुभमन गिलसोबत यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि आपली लय कायम ठेवण्यासाठी यशस्वीसाठी ही एक महत्त्वाची संधी असेल. यानंतर विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा या अनुभवी खेळाडूंवर फलंदाजीची मुख्य भिस्त असेल.

गोलंदाजीतही मोठे बदल

सिराजचे पुनरागमन: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो या सामन्यातून बाहेर राहण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज संघात पुनरागमन करू शकतो. (IND vs WI 3rd ODI)

ध्रुव जुरेलला संधी? मागील दोन सामन्यांत संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या नमन धीरच्या ऐवजी यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलला अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खालच्या फळीत आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता असल्यामुळे जुरेलसाठी ही संधी महत्त्वाची ठरेल.

वेगवान आणि फिरकी आक्रमणाची धुरा

प्रसिद्ध कृष्णाच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल, तर त्याला आकिब खान आणि गुरनूर ब्रार यांची साथ लाभू शकते. दुसरीकडे, फिरकी गोलंदाजीची मदार कुलदीप यादव आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्या खांद्यावर असेल. कुलदीप मुख्य फिरकीपटूची भूमिका बजावेल, तर जडेजा फलंदाजीसोबतच फिरकीचा उत्तम पर्याय ठरेल.

तिसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग-XI: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आकिब नबी, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >