पुणे शिक्षक मतदारसंघ अखेर भाजपकडे; महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला

मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा केला जात असताना ही जागा भाजपला देण्यावर महायुतीत एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप तीन, शिवसेना एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक अशा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, इच्छुकांची संख्या आणि स्थानिक पातळीवरील दावे लक्षात घेता उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे.


महायुतीच्या संभाव्य जागावाटपानुसार पुणे शिक्षक, पुणे पदवीधर आणि नागपूर पदवीधर या तीन जागा भाजप लढविणार आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला, तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे समोर आले आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी तिन्ही पक्षांमध्ये काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर भाजपकडे ही जागा देण्याच्या निर्णयामुळे या संघर्षाला विराम मिळाल्याचे मानले जात आहे.



पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यानंतर पक्षांतर्गत उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीन मतदारसंघांसाठी प्रत्येकी पाच संभाव्य उमेदवारांची नावे अशी एकूण १५ नावांची यादी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे दिल्याची माहिती आहे. केंद्रीय पातळीवर छाननीनंतर उमेदवाराचे नाव निश्चित केले जाणार आहे. दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघातून विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काम करणारे कौस्तुभ गावडे हे भाजपचे प्रमुख इच्छुक म्हणून पुढे आले आहेत. त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीच्या सूचना देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, जुनी पेन्शन योजना आणि गेल्या काही वर्षांत न सुटलेल्या प्रश्नांवर भर देण्याची भूमिका गावडे यांनी व्यक्त केली आहे.


विधान परिषदेच्या पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर असून, ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी आणि ९ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत उमेदवार निश्चितीबरोबरच संभाव्य बंडखोरांची भूमिकाही स्पष्ट होणार आहे.


मंगेश चिवटे यांच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे उमेदवारीसाठी आग्रही होते. त्यांनी महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यामुळे जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर चिवटे कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. यापूर्वीही शिवसेनेकडून या जागेवर दावा करण्यात आला होता. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ओसडी सचिन सानप हे देखील या मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मात्र, त्यांच्या पदरीही निराशा पडली आहे.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन करणार नाही; माजी आमदार विजय गिरकर यांचा ''सीजेपी''ला इशारा

जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 साली देशाला मतदानाचा अधिकार दिल्याच्या खोट्या कंड्या सीजेपीचे

Nitesh Rane News: मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यात आदित्य ठाकरेंची चौकशी करा, शिवसेनेची मागणी

मुंबई: मिठी नदी गाळ उपशात झालेल्या ६५ कोटींच्या घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरिया याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक

महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघाचा तिढा कायम ; भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचाही दावा

जागावाटपासाठी वरिष्ठ पातळीवर पुन्हा चर्चा होणार मुंबई : विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या

आदित्य ठाकरे देशाबाहेर पलायन करू शकतात - मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; लूक आउट नोटीस जारी करण्याची मागणी

मुंबई : मिठी नदी गाळ उपसा प्रकरणातील तपास आणि दिशा सालियन प्रकरणातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उबाठा गटाचे

ठाकरे बंधू तुकडे-तुकडे गँगचे सदस्य झालेत का? - मंत्री नितेश राणे यांचा सवाल

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत झालेल्या कॉकरोच जनता

‘सीजेपी’च्या आंदोलनाआडून उमर खालिद, शरजील इमामला ‘हिरो’ बनविण्याचा प्रयत्न; मंत्री नितेश राणेंनी उपस्थित केला सवाल

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी)