
मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचं काल दुपारी उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गावात निधन झाले. योगी यांच्या आई गेल्या अनेक महिन्यांपासून आजारीच होत्या, त्या 91 वर्षांच्या होत्या. आईच्या निधनाचे वृत्त कळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून लगेचच उत्तराखंडला रवाना झाले. आईचं अंत्य दर्शन घेताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आश्रुंचा बांध फुटला. आईला अखेरचा निरोप देताना त्यांना आश्रु अनावर झाले नाहीत. आईच्या पार्थिवाला खांदा देत, त्यांची अंत्ययात्रा हरिद्वारच्या चंडीघाट स्मशानभूमीकडे रवाना झाली. सावित्री देवी यांच्यावर आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात करणार आहेत.
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे शुक्रवारी उत्तराखंड राज्यातील पौरी गढवाल जिल्ह्यातील ...
योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्रींच्या अंत्यसंस्कारासाठी उत्तर प्रदेशासह देशातील अनेक बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोणकोणते नेते उपस्थित राहू शकतात? याबद्दलची यादी अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आईवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर ते लखनऊला परतणार आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शनिवारी दुपारी 02.15 पर्यंत उत्तराखंडमध्ये असतील. त्यानंतर ते लखनऊसाठी रवाना होणार आहेत. आज सायंकाळी लखनऊमध्ये कौशल दीक्षान्त समारंभ आहे, या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊला रवाना होणार आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शुक्रवारी गोरखपूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान त्यांच्या आईच्या निधनाची बातमी मिळाली. भाजप खासदार आणि भोजपूरी अभिनेते रवी किशन यांना सर्वात पहिली योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्रींच्या निधनाची बातमी मिळाली. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचे सल्लागार आणि माजी आयएएस अधिकारी अवनीश अवस्थी यांना माहिती दिली. 61 मिनिटांचे भाषण संपवून मुख्यमंत्र्यांना बॅकस्टेजला बोलवण्यात आले, तिथे आयएएस अधिकारी अवनीश अवस्थी यांनी योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या आईच्या निधनाची बातमी दिली. बातमी कळताच मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, पण त्यांनी संयम राखला आणि कार्यक्रम पूर्ण करून तात्काळ उत्तराखंड गाठलं.
#WATCH | Panchur, Uttarakhand: Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath gets emotional as he pays his last respects to his mother, Savitri Devi, who passed away yesterday. https://t.co/tDzb0WZpJ6
— ANI (@ANI) November 21, 2026
दरम्यान, उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गावात शुक्रवारी सकाळी सावित्री देवी यांचे त्यांच्या वडिलोपार्जित घरी निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. गावकऱ्यांच्या माहितीनुसार, बऱ्याच महिन्यांपासून त्या आजारी होत्या. त्यांचे शुक्रवारी सकाळी सुमारे 10.45 वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी त्यांच्या वडिलोपार्जित गावाला भेट देऊन आईला श्रद्धांजली वाहिली.
Education News: बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर ...




