Saturday, November 21, 2026

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण! एका आठवड्यात 11 हजारांनी सोने स्वस्त, चांदीही कोसळली

गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे दर घसरत आहेत. मात्र गेल्या वर्षभरातील सोन्याचे दर तब्बल 40 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याच्या दरातील या घसरणीमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार या दोघांच्याही मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. सोन्याचे दर रोज घसरत असताना आजचे दर काय आहेत? आणि किती वेळ घसरण काळ सुरू राहणार? याबाबत जाणून घेऊया.

Gold Rate : गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे दर घसरत आहेत. मात्र गेल्या वर्षभरातील सोन्याचे दर तब्बल 40 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याच्या दरातील या घसरणीमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार या दोघांच्याही मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. सोन्याचे दर रोज घसरत असताना आजचे दर काय आहेत? आणि किती वेळ घसरण काळ सुरू राहणार? याबाबत जाणून घेऊया.

सोन्याच्या दरात 16 ते 20 नोव्हेंबर रोजी प्रति 10 ग्रॅम म्हणजेच सुमारे 11,000 रुपयांची घसरण झाली. 24-कॅरेट सोन्याचा भाव 16 नोव्हेंबर रोजीच्या प्रति 10 ग्रॅम 1,34,380 रुपयांवरून घसरून 1,23,584  रुपयांवर आला आहे. तर, 22-कॅरेट सोन्याचा भाव आता प्रति 10 ग्रॅम 1,13,203 रुपये झाला आहे. 18-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम  92,688 रुपयांपर्यंत वाढला आहे.

भारतीय सराफा बाजारात 16 नोव्हेंबर रोजी 1 किलो चांदीचा भाव ₹ 169,280 होता, मात्र, आता तो घसरून ₹150,650 प्रति किलो झाला आहे. परिणामी, एका आठवड्यात चांदीच्या दरात अंदाजे ₹20,000 ची घसरण झाली आहे.

सोन्याचे दर घसरण्यामागील कारणं

1. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनेक घडामोडींचा परिणाम थेट सोन्याच्या घसरणीवर होत आहे. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्यावरील दबाव वाढला आहे. डॉलर मजबूत झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत सोनं महाग पडतं. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होण्याची शक्यता असते आणि त्याचा परिणाम थेट दरांवर होतो.

2. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरविषयक धोरणाबाबतही बाजारात अनिश्चितता आहे. व्याजदर वाढण्याचे संकेत मिळाल्यावर सोन्यासारख्या गुंतवणुकीकडे आकर्षण कमी होऊ शकते, परिणामी सोयीचे दर कमी होतात.

3.  अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती, आयातीवरील परिणाम, शेअर बाजारातील घसरण आणि जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोन्याच्या खरेदीतील सावध भूमिका यामुळेही सोन्याच्या दरांवर परिणाम होतो.

सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावरून सुमारे 37 टक्क्यांनी घसरला आहे. जानेवारी महिन्यात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1.93 लाख रुपयांवर विक्रमी उच्चांक गाठत पोहचला होता. मात्र, तेव्हापासून सोने आणि चांदी या दोन्हींच्या दरात दिवसागणिक घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे मूल्य आता प्रति 10 ग्रॅम 1.23 लाख रुपयांपर्यंत घसरले आहे. याचा अर्थ, सोन्याचा भाव त्याच्या उच्चांकावरून 70,000 रुपयांनी घसरला आहे. यंदाच्या वर्षात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >