डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन करणार नाही; माजी आमदार विजय गिरकर यांचा ''सीजेपी''ला इशारा

जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 साली देशाला मतदानाचा अधिकार दिल्याच्या खोट्या कंड्या सीजेपीचे नेते पिकवत आहेत. तुम्हाला जवाहरलाल नेहरू यांचा कितीही उदो उदो करायचा असेल तर करा. मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अवमूल्यन आणि अपमान करायचा प्रयत्न कुणी केला तर आंबेडकरी जनता आणि देशवासीय त्याचा धिक्कार करतील, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय (भाई) गिरकर यांनी शनिवारी दिला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याबद्दल देशभरात अभिजित दीपके यांचा निषेध झाल्याचे पहायला मिळेल, असेही श्री. गिरकर यांनी नमूद केले.


1949 साली डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान 1950 साली आपण स्वीकारले. तेव्हा अमेरिका, इंग्लंडच्या संविधानात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यासाठी त्यांना लढावे लागले. डॉ. बाबासाहेबांनी मात्र पुरुषांसोबत महिलांनाही मतदानाचा अधिकार दिला. इतकेच नव्हे तर 'टाटा बाटा'सोबत इथल्या गठई कामगारांना मतदानाचा अधिकार दिला. हे बाजूला ठेऊन डॉ. बाबासाहेबांना नाकारण्याचे काम चालले असल्याबद्दल श्री. गिरकर यांनी संताप व्यक्त केला. सीजेपीच्या मोर्चात सहभागी न होता त्यांना नाकारल्याबद्दल मुंबईकरांचे आभार मानत श्री. गिरकर म्हणाले, योगेंद्र यादव म्हणतात आता देशाचा कारभार संसदेतून नव्हे तर रस्त्यावरून चालणार. म्हणजे तुम्हाला देशात अराजकता आणायची आहे. या देशात झुंडशाही, अतिरेक आणि हिंसाचार घडवून आणायचा आहे. संविधानाने दिलेले न्यायालय, निवडणूक आयोग विधी मंडळ, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली प्रसार माध्यमे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार नाकारत यांना संविधानालाच विरोध करायचा आहे. आणीबाणीच्या काळात लोकशाही संस्थांवर निर्बंध आले. त्या इतिहासातून आपण धडा घेतला पाहिजे. भविष्यात कोणत्याही सरकारने किंवा कोणत्याही पक्षाने लोकशाही संस्थांच्या अधिकारांना बाधा पोहोचवू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि त्यातून निर्माण झालेली लोकशाही व्यवस्था ही प्रत्येक भारतीयाची आहे. त्यामुळे संविधानाचे संरक्षण करणे, मतदाराचा अधिकार सुरक्षित ठेवणे आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. याच भूमिकेतून आपण या विषयाकडे पाहिले पाहिजे, असे श्री. गिरकर म्हणाले.






काँग्रेस, कम्युनिस्टांनी डॉ. आंबेडकरांचा पराभव केला


मतचोरी आणि ज्ञानेश कुमार यांच्याविषयी आंदोलनात बोलले गेले. मात्र पहिली मतचोरी झाली होती ती नेहरूंना पंतप्रधान करण्यासाठी. सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान करण्यासाठी दहा मते पडली होती. मात्र नेहरूंना एकही मत न पडता गांधीजींनी त्यांना पंतप्रधान करून देशावर थोपले. दुसरी मतचोरी झाली ती 1952 साली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीसाठी त्यावेळच्या दक्षिण मध्य मतदार संघात उभे राहिले तेव्हा त्यांच्याविरुद्ध नेहरूंनी त्यांचे स्वीय सहाय्यक काजरोळकर यांना उभे करून डॉ. बाबासाहेबांना पाडले होते. त्यावेळच्या कम्युनिस्टांनी मते कुजवण्यास सांगितले. सुमारे 78 हजार मते बाजूला काढली गेली आणि दहा हजार मतांनी डॉ. बाबासाहेबांना पराभूत केले गेल्याची आठवण श्री. गिरकर यांनी करून दिली. त्यावेळी डॉ. बाबासाहेबांना पाडण्यासाठी स्वत: नेहरू प्रचाराला आले होते. त्यांनी पैसा पुरवला. मतदारांना निरनिराळी आमिषे दाखवून चुकीचा प्रचार करून बाबासाहेबांना पाडण्यात आले. वेळोवेळी अपमानित करून कॉंग्रेसकडून डॉ. बाबासाहेबांना नाकारण्यात आले आणि आताही 1951 साली नेहरू आणि डॉ. बाबासाहेबांनी मतांचा अधिकार दिल्याचे सांगत नेहरू यांचे नाव पुढे केले जात असल्याची टीका श्री. गिरकर यांनी केली.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला